श्री गुरुमाईच्या हस्ते ममता फाउंडेशनची स्थापना :

भुसावळ – येथील प्रसिद्ध उद्योगपती हिरांमण रघुनाथ फालक व त्यांच्या सुविद्य पत्नी समाजसेविका यांना समाज सेवेचा वसा घेतला असून समाजातील मिळेल त्याला मदतीचा हात यानुसार कार्य करीत आहेत . आजपर्यंत त्यांनी अनेक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सक्रिय कार्य केले आहेत . लोका: यानुसार सौ नूतन फालक यांनी नुकतीच ममता फौंडेशनची स्थापना केली आहे . या फाउंडेशनचे उदघाटन धुपेश्वर येथे श्री नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्त श्री गुरुमाईच्या हस्ते करण्यात आले .यावेळी प्रास्ताविकात संस्थेचे उद्दिष्ट व माहिती व कार्याची सविस्तर माहिती संस्थापक अध्यक्षा सौ नूतन फालक यांनी सांगितली . तसेच लोका: समस्ता: सुखिनो भवन्तु या धोरणानुसार फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविणार आहेत यावेळी धुपेश्वर येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित हजारो भाविकाना ममता फाउंडेशनच्या माध्यमातून अन्नदान महाप्रसादाचे आयोजन श्री व सौ नूतन फालक दाम्पत्याने केले . कार्यक्रमास उद्योजक हिरामण फालक , वैभव पाटील , यांचेसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते .