पारोळा तालुक्यातील शिवरे येथे २९ जणांना विषबाधा

पारोळा —
पारोळा तालुक्यातील शिवरे गावात शेतातीत अशुद्ध पाणी पिल्याने २९ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा तालुक्यातील शिवरे येथे शेतात काम करीत असलेल्या २९ मजुरांना विहीरी जवळ भरून ठेवलेल्या ड्रम मधुन पाणी प्यायल्याने विषबाधा झाल्याची घटना घडली
यात २० मजूर असून, ९ मुलांचा ही समावेश आहे. सर्व रुग्णांवर पारोळा येथील कुटीर रूणालयात उपचार सुरू आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे
दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घटनेची दखल घेऊन त्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत घटनेची इत्यंभूत माहिती जाणून घेतली. रुग्णांवर तत्काळ मोफत उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यानी पारोळा गटविकास अधिकारी किशोर शिंदे व तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी
यांना तत्काळ सूचना दिल्या घटनेचे गांभीर्य ओळखत गटविकास अधिकारी
किशोर शिंदे घटनास्थळी पोहचत परिस्थितीचा आढावा घेतला, शिवरे गावात मध्यप्रदेश हुन शेतमजुरीसाठी आलेल्या या २९ जणांनी शेतातील एका ड्रममध्ये अनेक दिवसांपासून साचलेले पाणी पिल्याने विषबाधा झाली असावी, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. २९ जणांपैकी २ जणांवर तामसवाडी आरोग्य केंद्रावर उपचार सुरू आहेत.
तालुका आरोग्याधिकाऱ्यांसह गटविकास अधिकारी कुटीर रुग्णालयात उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. गावातील पाण्याचे नमुने आरोग्यसेवकांनी घेतले आहेत. मा पालकमंत्री डॉ सतीश पाटील यांनी कुटीर रुग्णालयात भेट घेत सर्व बाधीताची विचारपूस केली व धिर दिला तसेच
पारोळा तालुक्याचे
आमदार चिमणराव पाटील यांनी कुटीर रुग्णालयात बाधीताची भेट घेत विचारपूस केली व अधिकार्यांना सुचना केल्या व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

विषबाधा झालेले शेत मजूर

विक्रम दिवाकर पावरा (वय १५), लोभान दिवान पावरा (वय ४), मिथून सखाराम पावरा (७). कैताग पावरा (१२), नाप्या तालसिंग पावस १०), हेमा दिवान पावरा (२४), प्रमिला भीमसिंग पावरा (१२), गीता गोविंदा पावरा (१०), रेता पावरा (१०), करीना पावरा (१२), अंजली दिवान पावरा (१३), नबिता राकेश पावरा (२१), दीदी राकेश पातरा (१०), अंजना राकेश पातरा (३), ईश्वर राकेश पावरा (२), रविना उदारा पावरा (६), सविता कातसिंग पावरा (६), राधिका कातसिंग पावरा (२), फिरका कालसिंग पावरा (३), अजय कातसिग पावरा (१३), हिना सीताराम पावरा (१९), सविता शैलजा पावरा (१८), देल्या कालसिंग पावरा (११), पूजा सीताराम पावरा (१), नविता राकेश पावरा (२२) व राधिका कालसिंग पावरा (२)
यांचा समावेश आहे.