भुसावळ रेल्वे स्कुल मध्ये संविधान विषयावर जनरल नॉलेज स्पर्धा ;

अशोका हाउसने
प्रथम क्रमांकावर स्थान पटकावले

भुसावळ – रेल्वे स्कूल ला संविधान विषयावर जनरल नॉलेज स्पर्धा आयोजित करण्यात आली.
ही स्पर्धा अकबर हाउस, सुभाष हाउस, शिवाजी हाउस, अशोका हाउस या चार हाऊस मध्ये होती.
यात अशोका हाउसने
प्रथम क्रमांकावर स्थान पटकावले .तर
दुसऱ्या क्रमांकावर सुभाष हाऊस व शिवाजी हाउसने बाजी मारली .
अशोका हाऊसचा कनिष्क शरद साळवे याने अचूक उत्तरे देऊन आपल्या हाउस ला प्रथम क्रमांक मिळवून दिला . स्पर्धेत सर्व रेल्वे स्कूलचे विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी होत्या.
शाळेचे को. ऑर्डीनेटर उपाध्याय सर , मंगला भालेराव सह शाळेतील शिक्षकयांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले . प्रसंगी संविधानच्या गीतावर मुलांनी नृत्य सादर केले .मंगला भालेराव मॅडम यांनी मुलाची तयारी करून घेतली. शाळेच्या उपप्राचार्य स्वाती मॅडम तसेच निरंजना तायडे मॅडम, मोनालिसा भोपटे मॅडम उपस्थित होत्या.
यावेळी जवाहर नवोदय विद्यालयाचे मुख्याध्यपक अंभोरे सर, भुसावळ न्यायालयातील अँडव्होकेट रायभोले,अँडव्होकेट मनीषा यांचेसह मान्यवर शिक्षकवृंद , विद्यार्थी व पालक उपस्थित होते