भू .न. पा च्या करवा ढीस विरोध.
कराच्या मोबदल्यात सुविधा
पुरवा– शिशिर जावळे
हजारोंच्या संख्येने आक्षेप आणि हरकती नोंदवा. मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांना पाठविले विनंती पत्र.

भुसावळ –नुकताच भुसावळ नगरपालिकेतर्फे कोरोना काळात रखडलेल्या शासनाच्या कर निर्धारण नुसार तीन वर्षांनी मालमत्तांचे नुकतेच पुनर्मूल्यांकन करण्यात आले. व त्यात पालिका हद्दीत वाढलेल्या नवीन व जुन्या मालमत्तांवर दहा टक्के कर वाढ जाहीर करण्यात आली .
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सन 2020 -21 मध्ये दर तीन वर्षांनी पालिका क्षेत्रात शासनाच्या करनिर्धारण नियमानुसार मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक होते. मात्र ही प्रक्रिया कोरोनामुळे रखडलेली होती 2022 मध्ये सुरू झाली. भुसावळ शहरांमध्ये 2023- 24 2026- 27 या चार वर्षांसाठी जुन्या मालमत्ता भूखंड सुधारणा व नवीन बांधकाम झालेल्या मालमत्तांचे मोजमाप करून भुसावळ पालिकेने सप्टेंबर मध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली. आणि पालिका हद्दीत वाढल्या नवीन मालमत्ता व जुन्या मालमत्तांवर दहा टक्के करवाढ करण्याचा निर्णय भुसावळ नगरपालिका प्रशासनाने घेतलेला आहे. त्यानुसार संबंधित मालमत्ताधारकांना नवीन पुनर्मूल्यांकन कर निर्धारण पत्रक वित रीत केले जाणार असून याबाबतीत दिनांक 15 नोव्हेंबर पर्यंत नागरिकांकडून हरकती मागवण्यात आलेल्या आहे.
गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून सातत्याने अ दर्जा असलेल्या भुसावळ नगरपालिके कडून शहरांमध्ये नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या मूलभूत सेवा सुविधा कराच्या मोबदल्यात पुरविल्या जात नाही , तसेच कर पत्रकावर नमूद असलेल्या विविध सेवा सुविधां न पुरविता कर वसूल केला जातो. अजूनही भुसावळ शहरांमध्ये कराच्या मोबदल्यात नागरिकांना पिण्याचे पाणी, चांगले रस्ते वीज ,गटारी , स्वच्छता वगैरे सुविधा पुरविल्या जात नाहीयेत. त्यामुळे भुसावळ पालिकेकडून नागरिकांना विनाकारण मालमत्तकरांमध्ये दहा टक्के वाढ करून वेठीस धरले जात आहे. त्यामुळे भुसावळ पालिका प्रशासनाने ही करवाढ त्वरित रद्द करून आधी नागरिकांना कराच्या मोबदल्यात आवश्यक मूलभूत सेवा सुविधा पुरवाव्यात असे विनंती पत्र मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथराव शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पाठविले असल्याचे शिशिर जावळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविलेले आहे. तसेच भुसावळकर नागरिकांनी हजारोंच्या संख्येने दिनांक 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत याबाबत आपले हरकती आक्षेप भुसावळ नगरपालिकेत नोंदवावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे.


