बियाणी परिवारासह मित्र मंडळी चारधाम तिर्थयात्रा करून सुखरूप परतले:ढोल गजराग भुसावळ रेल्वे स्थानकात जंगी स्वागत.


भुसावळ – येथिल बियाणी एज्युकेेशन गृपचे अध्यक्ष मनोज बियाणी नुकतेच त्यांच्या परीवारासह व त्यांचे मित्र मंडळी समाज बांधव हे सर्व १७ जणांचा गृप चारधाम तिर्थयात्रेसाठी भुसावळ येथून दि १ रोजी गेले होते. अतिशय खडतर रस्ता व कठीण प्रवास पहाडी एरीया, त्यात अधुन मधून खराब हवामान यांचा सामना करीत हरीद्वार,ऋषीकेश,गंगोत्री,यमोनोत्री,बद्रीनाथ,केदारनाथ अशी सर्व तिर्थक्षेत्राची यात्रा त्यांनी सुखरुप पार करुण शनिवारी दि १४ रोजी भुसावळला पोहोचले.त्यांच्या सोबत डॉ.संगिता बियाणी,रोनक बियाणी,आयुषी बियाणी,डॉ.मुस्कान बियाणी व त्यांचे मित्र परीवार होता. या वेळी बियाणी यांचे भुसावळच्या रेल्वे स्थानकावर ढोल ताश्याच्या गजरात जंगी स्वागत समाज बांधव व नातेवाईकांनी केले. रेल्वे स्थानकावर कांताबाई बियाणी,विनोद बियाणी,स्मिता बियाणी,रूपेश भांगडिया, संकेत लढढा, राधेश्याम लाहोटी,गोपाळ ठाकूर,प्रविन भराडीया,मनोज माहेश्वरी,किशोर कोलते,नितीन नंदवणे आदी उपस्थित होते.
बियाणी मिलीटरी स्कुल मध्येही ढोल ताश्याच्या गजरात, लेझीम पथक सह जंगी स्वागत करण्यात आले.
मनोज बियाणी हे सह परिवार बियाणी मिलीटरी स्कुल मध्ये प्रवेश करताच त्यांच्यावर पुष्पांचा वर्षाव करण्यात आले. रस्त्याने जागो जागी त्यांचे औक्षण करण्यात आले. शाळेचा परिसर सजवण्यात आला होता, जागो जागी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. जय भोले,ओम नमं शिवाय, जय बद्रीनाथ, जय केदारनाथ अशा घोषणा देण्यात आल्या. कलश धारी विद्यार्थीनीच विशेष आकर्षण होत.