भुसावळ – साडेतीन मुहूर्तातील महत्वाचा एक असा सण म्हणजे ‘अक्षयतृतीया सण होय . आपल्या खानदेशात या सणाचे खूप महत्व आहे , या सणाच्या निमित्ताने माहेरपणासाठी सासरवाशीन लेकी- सुना माहेरी येतात. यावेळी त्यांच्या आनंदाला उधान येते सख्या मैत्रीणि व माहेरच्यां सोबत धींगा मस्तीत रमून जातात .
ग्रामीण भागात या सणा निम्मित झाडाला ऊंच झोके बांधले जातात ,सर्व सख्या एकत्रित येऊन विविध खेळ खेळतात , माहेरी आमरस ,(मांडे) पुरण पोळी’, कुरडई , पापडाचां आस्वाद घेतात . परंतू बदलत्या परिस्थितिनुसार तसेच जिवनशैलीमुळे हे सगळे चित्र आता दुर्मिळ झाल्या सारखे वाटत आहे . यांचा विचार आमदार संजय सावकारे यांच्या मनात आला त्यांनी ही संकल्पना प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ रजनी सावकारे व सदस्य यांना सांगितले .
त्यानुसार अक्षयतृतीया निम्मित आठवणीतले माहेर या कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठा महिला मंडळा तर्फे स्टार लॉन येथे सर्व माताभगिंनी साठी करण्यात आले..
सर्व महिलाभगिनी आल्या बैलगाडीतुन
या कार्यक्रमाचे वैशि्ट्य म्हणजे महिलांना बैलगाडीतून कार्यक्रमा स्थळी आणण्याची व्यवस्था करण्यात आली.स्टार लॉन येथे आयोजित या कार्यक्रमाला कार्यक्रमा स्थळी बैलगाडी, झोके व वेगवेगळे सेल्फी पॉइंट ठेवण्यात आले ज्याचा महिलांनी मनशोक्त आनंद घेतला. मनोरंजनात्मक कार्यक्रमात वेगवेगळ्या स्पर्धा ठेवण्यात आल्या. यात नृत्य स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा (ग्लोबल वॉर्मिग ) निबंध स्पर्धा,मेहंदी स्पर्धा,बेस्ट इंडियन ब्रायडल स्पर्धा तसेच वेगवेगळे गेम्स (खेळ ) ठेवण्यात आले . ज्यात महिलां मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले. तसेच लकी ड्रॉ द्वारे 5 महिलांना कजरी साडी सेंटर तर्फे पैठणी देण्यात आली ..
या कार्यक्रमाची सुरुवात गणेशपूजन व गौरपुजन आमदार संजय सावकारे यांच्या मातोश्री सुशीलाबाई सावकारे यांच्या हस्ते करण्यात आली.या कार्यक्रमात विविध संस्थांचे अध्यक्ष,नगरसेविका, पंचायतसमितीचे माजी सभापती,सरपंच,कृषीउत्पनन बाजार समिती सदस्य यांची उपस्थिती लाभली.
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या सदस्यांनी अक्षयतृतीया चे महत्व,पारंपरिक खेळ झिम्मा,फुगडी तसेच सासरवाशिन महिलेचे रुसवेफुगवे सादर करीत उपस्थितांचे मन जिंकले…
या स्पर्धेतील विजेत्या महिला
मेंहदी स्पर्धा – रुपा अग्रवाल
तळ्यात मळ्यात – लतिका क्षिरसागर
संगित खुर्ची – अर्चना खापेकर
निबंध स्पर्धा – रुपा अग्रवाल , शामली सुरंगे , नव वधू वेषभूषा स्पर्धा – १. सोनाली चौधरी २.प्रियंका समूह नृत्य स्पर्धा – प्रथम नुपूर डान्स अकाडमी ,
डी जे गृप
फैंन्सी ड्रेस स्पर्धा , स्वाती गाजरे
रुपा अग्रवाल ,
स्पर्धेत परीक्षक म्हणून रजनी जैन,अपूर्वा फेगडे,राजेशी देशमुख,अनिता आंबेकर लाभले. सूत्रसंचालनात राजेश्री देशमुख यांनी महिला भागिनिना आपल्या खुमासदार शैलीत गावाच्या पारावर अंब्याचे झाडाखाली नेवुन मनमोहक अनुभव दिले
मंडळाचे सदस्य लता सोनवणे,अनिता आंबेकर, सोनल महाजन,मनीषा काकडे, सरला सावकारे, राजेश्री देशमुख,अलका भटकर,सुनंदा भारुळे,वैशाली सैतवाल,वर्षा लोखंडे,राजश्री बादशाह,चैताली राणे,मनीषा मोपारे,संगीता सिरसाठ ,चैताली राणे यांनी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यास परिश्रम घेतले.

महिलांच्या प्रतिक्रिया .
अगदी माहेरी आल्यासारखं वाटलं – डॉ भाग्यश्री भंगाळे
कार्यक्रमात तुम्ही केलेले
प्रत्येकाचे हसतमुखाने स्वागत, मोगऱ्याचा गजरा,
हळदी कुंकू, संगीत खुर्ची, डान्स, वेशभूषा स्पर्धा,
प्रत्येकीच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा उत्साह,
कार्यकर्त्यांची होणारी लगबग, आणि मुख्य म्हणजे
साजूक तुपातील पुरणपोळीचे अप्रतिम जेवण सोबत
बहारदार हापूसचा रस , कटाची आमटी सारेच काही
खूपच सुंदर होते. त्याला शब्दच नाही. अगदी माहेरी
आल्यासारखं वाटलं. भविष्यातही तुम्ही असेच
कार्यक्रम आयोजित करत रहा . आमचे तुम्हाला
सहकार्य राहीलच.


