भुसावळातील ताप्ती पब्लीक स्कुल मध्ये सरस्वती देवीच्या मुर्तीची स्थापना.


भुसावळ -ताप्ती पब्लीक सीबीएसई इग्लिश मिडीयम स्कुल मध्ये दि २ मे रोजी सकाळी 10 वा. ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक व त्यांच्या पत्नी कल्पना फालक यांच्या हस्ते सरस्वती देवीच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली. या वेळी संस्थाध्यक्ष डॉ.मोहन फालक,स्मिता फालक,शिक्षण अधिकारी किशोर वायकोळे
प्रिंसीपल निना कटलर,ओएस सविता सहजे,यांच्या सह शिक्षक वर्ग उपस्थित होते.
शाळेने 350 किलो वजनाची पांढऱ्या पाशानापासून तीन फुट उंच मुर्ती राजस्थान येथून खास तयार करुन आणली असून मुर्तीवर गेल्या वीस दिवसांपासून काम सुरू होते. अतीशय विलोभनीय अशी सरस्वती देवीची मुर्ती भुसावळात सर्वात प्रथम ताप्ती पब्लीक स्कुलनेच आणली आहे.
मुर्तीसाठी सेपरेट प्रेअर रुम तयार करण्यात आले आहे. मुर्तीचे पुजन व हवन श्रीकांत घीर्णीकर यांनी मंत्रपोपचाराने केली. सरस्वतीची मुर्ती स्थापने नंतर दर्शनासाठी सर्वांनी एकच गर्दी केली होती. यानंतर शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.