भुसावळ – तालुक्यातील ग्रामपंचायत बेलव्हाय येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर विधी सेवा समिती व भुसावळ तालुका वकील संघ मार्फत घेण्यात आले.
संविधानातील मुलभूत अधिकारात बालकांना असलेला शिक्षणाचा अधिकार याविषयावर उपस्थित प्रमुख वक्ते यांनी विचार मांडले
सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ वकील संघाचे महिला प्रतिनिधी ॲड. जास्वंदी भंडारी या उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच सौ.उज्वला सोनवणे यांनी भुषविले प्रमुख वक्ते ॲड.अभिजीत मेने, ॲड.आय.आय.खान यांनी संविधान मध्ये भारतीय नागरीक साठी देण्यात आलेले मुलभूत कर्तव्य तसेच मोफत शिक्षणा चा अधिकार संबंधी करण्यात आलेला कायदा या विषय वर माहिती दिली.
प्रत्येक भारतीय नागरीकांचे चे मुलभूत कर्तव्य आहे की त्याने देशा च्या प्रगती साठी बौधिक आणि शारिरिक श्रम करणे ,देश चा रक्षण साठी नेहमी तत्पर राहणे,सर्व धर्म,जाती मध्ये एकता आणि बंधुभाव निर्माण करणे, राष्ट्रीय ध्वज,गीत,प्रतीक ,स्वतंत्रसेनानी , संस्कृती चे सन्मान करणे, इत्यादी.
तसेच मुफ्त शिक्षण अधिकार कायदा अंतर्गत आर्थिक मागस वर्गातील कुटुंबातील ६ ते १४ वयोगटातील बालक मुफ्त शिक्षण घेऊ शकता, यासाठी प्रतेक शाळा मध्ये २५ टक्के आरक्षण देण्यात आलेला आहे, म्हणून मुला मुलींना शिकवा आणि देशाचे चांगले नागरिक बनवा असे मत दोघं वक्त्यांनी मांडले .
ॲड.जास्वंदी भंडारी यांनी उपस्थित महिलांना आपल्या मुलांना तर शिकवा पण स्वतः ही सक्षम होण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा फायदा
घेवुन गृह उद्योग सुरू करावे असे सांगितले तसेच विधी सेवा समिती चे काय कार्य आहे हे ही थोडक्यात सांगितले ॲड केझार भारमल यांनीही उपस्थितांना माहिती दिली
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लिपीक श्री कमलाकर जावळे बेलव्हाय ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री महिपाल धुरंधर ,गा.पं सदस्य नितीन बोंडे, सुनिता सोनवणे, मनिषा खाचणे, रोशनी भंगाळे व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमासाठी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.



