भुसावळात ढोल ताश्यांच्या गजरात परशुराम जयंती उत्साहात साजरी : विलोभनीय शोभायात्राने वेधले लक्ष :


भुसावळ – अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर परशुराम जयंती 2023 22 रोजी धुमधडाक्यात मोठ्या उत्साहात भुसावळ शहरात साजरा करण्यात आला. प्रसंगी काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेचे दृश्य अत्यंत विलोभनीय, न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं होतं. सदर शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी सहभाग घेतलेल्या सर्व समिती सदस्य, समाज बांधव व भुसावळकरांचे प्रतिसादाबद्दल कोटी कोटी ऋण व्यक्त करण्यात येते. सदर शोभायात्रेस खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व आमदार संजय सावकारे यांनी उपस्थिती देऊन शोभा यात्रेची शोभा वाढवली. राजकीय क्षेत्रातून देखील शोभायात्रेस भरगच्च प्रतिसाद मिळाला. यावेळी युवराज लोणारी, राजू आवटे दादा, पिंटू कोठारी, बोधराज दादा चौधरी,परीक्षित ब-हाटे ,मुकेश गुंजाळ यांनी आपली उपस्थिती दर्शविली.
सदर शोभायात्रेच्या स्वागतासाठी भुसावळ शहरातील अग्रवाल समाज व माहेश्वरी समाज प्रतिनिधींनी शोभायात्रेत लस्सी वाटप, आईस्क्रीम, पाणी पाऊच वाटून सलोख्याची भावना जोपासली. अष्टभुजा देवी मार्गे निघालेल्या शोभायात्रेत महिलांचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व राहिले. महिलांचे ध्वजपथक, लेझीम पथक, अमळनेर येथील ढोल पथक, भगवान परशुरामांची तेजस्वी मूर्ती व भगवान परशुरामांची सजीव आरास व पालखी हे शोभायात्रेचे वैशिष्ट्य राहिले. परशुराम प्रकटोत्सव समिती 2023 चे अध्यक्ष पाथरकर गुरुजी, उपाध्यक्ष वेद प्रकाश ओझा, सचिव संकेत कुलकर्णी, खजिनदार गौरव हिंगवे सदर प्रतिसादाबद्दल सर्व ज्ञात आणि अज्ञात परशुराम भक्तांचे आयोजकानीं ऋण व्यक्त केले