भुसावळ – राज्य सरकारने गुढीपाडवा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने गोरगरिबांना 100 रुपयात आनंदाचा शिधा किटचे वाटप करण्याचा निर्णय घेतला होता .मात्र काही कारणास्तव गुढीपाडवा सणाला आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना मिळाला नाही मात्र गुरुवार पासुन रेशन दुकानात आनंदाचा शिधा किट उपलब्ध झाले आहे. या आंनदाचा शिधा किट मध्ये रवा, साखर, चनाडाळ, तेल उपलब्ध आहे.

भुसावळ शहरातील प्रल्हाद नगर भागातील रेशन दुकान क्रमांक 54 एन. पी. नरवाडे संचालित माजी नगरसेविका नंदा प्रकाश निकम यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा किटचे वाटप करण्यात आले. रमजान महिना , रामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती, गुड फ्रायडे , महात्मा ज्योतिबा फुले जयंती , विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती, अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर आंनदाचा शिधा किट मिळत असल्याने राज्य सरकारच्या या योजनेचा लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश निकम उपस्थित होते. सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी आंनदाचा शिधा किट योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व जातीय सलोखा व एकात्मतेचा संदेश देऊन गुण्यागोविंदाने आपले सण उत्सव साजरे करावे असे आवाहन माजी नगरसेविका नंदा प्रकाश निकम यांनी केले असून सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी लाभार्थ्यां मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून आले.


