भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतरंग 2023 वार्षिक स्नेह्सम्मेलनात रविवारी महाविद्यलयात सारी आणि टाय डे दिवस साजरा करण्यात आला.

प्राचार्य डॉ. आर. बी. बारजिभे, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. डि. जी. अग्रवाल, डॉ.गिरीश कुलकर्णी , प्रा. ए. व्ही. पाटिल, डॉ.एस. बी. ओझा, डॉ. पंकज भंगाळे, डॉ. अजित चौधरी, डॉ. डि. डि. पाटील यांची उपस्थिती होती. प्रा. सौ. एस. एम. शिंदे, प्रा. लीन अग्रवाल व डॉ. आय. डी. पॉल यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकांत परदेशी, सचिव श्रीमती. एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसन अग्रवाल,पंकज संड यांनी शुभेच्छा दिल्या.


