भुसावळात महिलांची मोफत तपासणी व उपचार शिबिर संपन्न :

भुसावळ – येथे” पोषण पंधरवाडा” निमित्त लोणारी मंगल कार्यालयात इनर व्हील क्लब व प्रतिष्ठा महिला मंडळ आणि मानवता कॅन्सर सेंटर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांची मोफत तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले .

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे ,प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी होते. कार्यक्रमास माजी नगरसेविका मिनाताई लोणारी,इनरव्हील क्लबच्या पास्ट असोसिएशन प्रेसिडेंट डॉ. रश्मी शर्मा,
प्रतिष्ठा मंडळ व जेसीआई क्लब च्या विद्यमान आणि इनेरव्हील क्लब च्या माजी अध्यक्षा रजनीताई सावकारे, इनरव्हील क्लब प्रेसिडेंट सौ.रुचिका शर्मा,
भाजप महिला शहर अध्यक्ष अनिता आंबेकर, भाजप शहर अध्यक्ष परिक्षीत ब-हाटे, क्लब सचिव प्राची राणे , लता सोनवणे ,सीडीपीओ दुपारे मॅडम यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती.नासिक येथील मानवता कॅन्सर सेंटरचे डॉ. स्नेहल कायांदे, डॉ. रिजू सत्तार, संस्थेचे डेप्युटी मॅनेजर राहुल सुर्यवंशी, अनिरुद्ध शेंडे,शैलेश कराळे यांनी सर्व महिलांची तपासणी केली. व काही महिलांना पुढील तपासणी साठी नाशिक येथे नेण्याची व्यवस्था करण्यात आली..
प्रास्ताविक क्लब प्रेसिडेंट रुचिका शर्मा यांनी केले. क्लब च्या PAP डॉ. रश्मी शर्मा यांनी महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले. मानवता कॅन्सर सेंटर चे डेप्युटी मॅनेजर राहुल सुर्यवंशी यांनी कॅन्सर ची लक्षणे, कारणे याबाबत मार्गदर्शन केले. प्रतिष्ठा महिला मंडळ च्या अध्यक्षा सौ. रजनीताई सावकारे यांनी सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे उकृष्ट कामाबद्दल कौतुक केले, व त्यांनी काम करतांना बालके, गरोदर माता, स्तनदामाता यांच्या बरोबर स्वतःची ही काळजी घ्यावी असे आवाहन केले. . आमदार संजयजी सावकारे यांनी वेळेवर तपासण्या केल्याने व लवकर निदान झाल्याने कॅन्सर सारखा रोग बरा होऊ शकतो, तसेच अंगणात परसबाग लावुन सेंद्रीय भाजीपाला, फळे इ.पदार्थाचे जास्तीत जास्त सेवन करावे, पॅक फूड वापर कमी करावा असे प्रतिपादन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एबावीसेयो भुसावळ ग्रामीण च्या पर्यवेक्षिका जयश्री जोशी, शोभा जाधव, रोझतकर यांनी तथा मंडळाच्या व क्लबच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.क्लबच्या सदस्या स्वाती देव यांनी संपूर्ण टीमच्या राहणाऱ्या ची उत्तम सोय करून दिली.

सुत्र संचालन मनीषा तायडे तर आभार क्लबच्या व्हाईस प्रेसिडेंट तथा मंडळाच्या सदस्या अलका भाटकर यांनी केले. कार्यक्रमास कमल सचदेव, जयश्री दवे, संगीता जाधवानी,वैशाली भगत, ,मनीषा काकडे,अनिता आंबेकर,जयश्री चौधरी,सुनंदा भारुळे,वैशाली सैतवाल,सरला सावकारे, पूजा पाटील उपस्थित होत्या चौधरी.
अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच शहरातील महिलाअसे २५० महिलांनी व पुरुषांनी पण या शिबिराचा लाभ घेतला.