रेलवे चे मुख्य सुरक्षा कमिशनर यांनी भादली-भुसावळ दरम्यान सिग्नलची केली पाहणी :


भुसावळ – विभागाचे भादली-भुसावळ दरम्यानचे मुख्य सुरक्षा आयुक्त .मनोज अरोरा यांनी ट्रॅक चेंजिंग पॉईंट, विद्युत खांब, ट्रॅक, वाघूर पूल, सिग्नलची पाहणी सुरक्षेच्या दृष्टीने ट्रॅकची पाहणी केली.
भादली स्टेशन पासुन सकाळी 9.30 वाजता निरीक्षण सुरू झाले, भुसावळ दुपारी 1.30 वाजता संपले. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता भुसावळ ते भादली 120kmph स्पीडची ट्रायल रन घेण्यात आली आणि ती यशस्वीरित्या सफल झाली.

निरक्षण दरम्यान भुसावळ विभागीय रेल्वे प्रबंधक श्एस.एस.केडिया, मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) श्री.विवेककुमार गुप्ता, मुख्य अभियंता (बांधकाम) संजय झा, उपमुख्य अभियंता बांधकाम पंकज धावरे, वरिष्ठ विभागीय अभियंता तरुण दंडोतिया, वरिष्ठ विभागीय परिचालन अधिकारी डॉ.एस.मीना, वरिष्ठ विभागीय सिग्नल अभियंता विजय खैंची व इतर अधिकारी उपस्थित होते.