भुसावळ – मुख्य प्रेरणा स्थान आदरणीय पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय आबासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने हे पर्यावरणाविषयीचे त्यांचे जे ध्येय होते ते राज्याध्यक्ष प्रमोद दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होत आहे. राज्याध्यक्ष प्रमोद दादा मोरे राज्यसचिव वनश्रीताई मोरे राज्य उपाध्यक्ष मनीषाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळच्या स्वाती प्रवीण भोळे यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली . तसेच जिल्हाउपाध्यक्ष सौ आरती सारंग चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
पर्यावरणाचे विविध उपक्रम राबवीत असताना प्रत्येक जिल्ह्यात मंडळाच्या शाखा कार्यरत असून जळगाव जिल्ह्यात नुकताच अध्यक्षपदाचा मान भुसावळ तालुक्याचे उत्कृष्ट काम पाहता भुसावळ तालुक्याला मिळाला. यावेळी सर्व पर्यावरण प्रेमी सदस्य उपस्थित होत्या.
सौ माधुरी शिंपी,
सौ रिता नाईक,सौ मंदाकीनी केदारे,सौ प्रियंका चौधरी,सौ जया इंगळे,सौ सारीका फालक,सौ विजया निकम,सौ राजश्री बादशाह,सौ विजया पाटील,सौ सुरेखा पाटील,सौ शितल अरोरा,
सौ शालीनी वाढेकर,
सौ भारती चव्हाण,
सौ महानंदा पाटील,
सौ योगिता दिलीप भालेराव, उपस्थित होते या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .



