भुसावळ:- मुन्सिपल पार्क येथील अतिशय पुरातन असे पाथरवट समाज बांधवांचे भगवान श्री विश्वकर्मांचे मंदिर आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी विश्वकर्मा नाम सप्ताह आणि जन्मोत्सवाची परंपरा सुरू आहे संस्थेतर्फे यंदा देखील हा नाम सप्ताह अनेक धार्मिक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला .

.रथसप्तमी पासून प्रारंभ झालेला या नाम सप्ताहात सात दिवसापासून भगवान विश्वकर्मांचे अखंडपणे नामस्मरण केले जात आहे दररोज काकडा आरती, हरिपाठ, भजन,सत्संग कीर्तन आधी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पाथरवट समाजातील मुला मुलींच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्याच्या हेतूने गुरुवार रोजी मंदिराच्या प्रांगणात भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या नृत्य स्पर्धेत लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत अनेक मुला-मुलींनी सहभाग नोंदवला शुक्रवार रोजी पहाटे भगवान विश्वकर्मांचा जन्मोत्सव सोहळा पार पडला या सोहळ्याच्या निमित्ताने समाज बांधवांच्या माध्यमातून पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या पालखी सोहळ्यामध्ये समाजातील मुला मुलींचे तसेच पुरुष महिलांचे लेझीम पथक भुसावळ शहरवासीयांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला भगवे फेटे आणि पांढरा कुर्ता घातलेल्या महिला पुरुषांच्या पोशाखाने सर्वांचे लक्ष वेधले. ढोल ताशांच्या गजरात लेझीमच्या तालात हा दिंडी सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला.सोबतच टाळकरी वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा देखावा देखील मंडळातर्फे सादर करण्यात आला होता मिरवणुकीनंतर नृत्य स्पर्धेतील आणि विजेत्यांचे बक्षीस वितरण पार पडलेनृत्य स्पर्धेचे आयोजन श्री योगेश उबाळे यांनी केले
तसेच या नाम सप्ताहामध्ये ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्यांचा हृदय सत्कार मंडळातर्फे करण्यात आला यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्णा पाथरवट, उपाध्यक्ष श्री विनोद उबाळे, सचिव श्री संजय पेभरे,खजिनदार श्री वासुदेव पाथरवट,कार्याध्यक्ष प्रभाकर रणदिवे सदस्य श्री ईश्वर नागपुरे श्री सुभाष दादा टोकेकर आदी मान्यवर उपस्थित होते सत्कार सोहळ्यानंतर काल्याच्या कीर्तन ह भ प प्रल्हाद डाके महाराज यांनी केले तदनंतर मंडळातर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अनेक भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला सदर जन्मोत्सव सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सर्व पाथरवट समाज बांधवांचे सहकार्य लाभले…


