सायकलपटू विजय फिरके यांचा १२०० किमी सायकलिंग स्पर्धेत यशस्वी सहभाग :भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे विशेष सत्कार”

भुसावळ – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे सायकलपटू विजय फिरके यांनी १२०० किमी बीआरएम स्पर्धेत यशस्वी सहभाग नोंदविला . बडोदा सायकलिस्ट क्लबतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 26 ,27 ,28 ,29 जानेवारी असे सलग चार दिवस सायकल चालवून 86 तासात त्यांनी ही कामगिरी पूर्ण केली .या चार दिवसात त्यांनी प्रत्येक रात्री केवळ दोन तास आराम केला .बडोदा ते सातारा व पुन्हा परत सातारा ते बडोदा असे १२०० किमीचे अंतर होते .यादरम्यान त्यांनी खंडाळा ,लोणावळा ,कामशेत घाट ,कात्रज घाट ,घोडबंदर घाट ,खंबाटकी घाट आदी वेगवेगळ्या घाटातून दिवस रात्र सायकलने प्रवास केला .सदरच्या स्पर्धेत 21 सायकलपटू सहभागी झाले होते. त्यापैकी केवळ १९ सायकलपटूंना ही कामगिरी शक्य झाली. यशस्वी सायकलपटूंमध्ये ३ महिलांचा देखील सहभाग आहे .
याआधी देखील 1000 किमी स्पर्धेत यशस्वी सहभाग विजय फिरके यांनी नोंदविला आहे .त्याशिवाय पुणे येथील हाफ आयर्नमॅन स्पर्धेत देखील त्यांनी मागील वर्षी सहभाग नोंदविलेला होता .त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे .
गुरुवारी बडोद्याहून भुसावळला परतल्यानंतर सकाळी भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे त्यांचा संजय भदाणे व सारंग चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मार्च महिन्यात भुसावळ रनर्सतर्फे लेडीज रनचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा सरावाचा भाग म्हणून रनिंग सेशन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी विजय फिरके यांचे सर्व धावपटूंतर्फे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी महिला धावपटू डॉ चारुलता पाटील, स्वाती फालक, वर्षा वाढिले , मंजू शुक्ला ,माया पवार ,मोनिका देशमुख ,भारती चव्हाण ,स्वाती भोळे ,दीपा स्वामी ,विजया पाटील ,चारुलता अजय पाटील ,निलंबरी शिंदे ,ममता ठाकूर ,अर्चना चौधरी यांच्या सोबतच पुरुष धावपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.