जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुका पोलीसांनी तालुक्यात हातभट्टी व मटका जुगार वर कारवाई केली त्यात नांद्रा बुद्रुक ता.जळगाव येथील सुक्राम ओंकार कोळी याच्या ताब्यातून गावठी दारू २५ ली.किंमत १२०० रुपये ची जप्त केली.तसेच गणेश जगन्नाथ कोळी रा.इंदिरानगर ममुराबाद ता जळगाव याच्या ताब्यातून गावठी दारू २५ लिटर किंमत १० हजार रुपये ची जप्त केली.तिसऱ्या कारवाईत विघन साहेबराव सुरवाडे रा.सावखेडा बुद्रुक ता.जळगाव याच्या ताब्यातून गावठी दारू २५ लिटर किंमत १२०० रुपये जप्त केली

.ममुराबाद ता जळगाव येथील आंबेडकर नगरातील रहिवाशी विजय पितांबर सोनवणे ३० लिटर गावठी दारू किंमत १२०० रुपये तसेच विनोद रमेश सोनवणे रा.नांद्रा ता जळगाव याच्या ताब्यातून ३५८ रूपये रोख व सट्टा जुगाराचे साधने जप्त करण्यात आलीअसून वरील सर्व दोषींवर कारवाई करण्यात आली आहे.
.ही कारवाई तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, ठाणे अंमलदार माणिक सपकाळे , अनिल मोरे , संदिप पाटील, लोखंडे यांनी केली.


