माजी राज्यमंत्री प्रहार संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या प्रकृतीची भुसावळचे चौधरी बंधू यांनी केली चौकशी :

भुसावळ -माजी राज्यमंत्री प्रहार संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांचे निवासस्थानी माजी आमदार संतोष चौधरी, प्रहार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी भेट घेवून प्रकृती स्वास्थ्य बाबत चौकशी केली .

माजी राज्यमंत्री प्रहार संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता.
आज १ फेब्रवारी त्यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस माजी आमदार संतोष चौधरी, प्रहार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी केली

या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख (बाळासाहेब ) निलेश पाटील, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सचिन संतोष चौधरी, धीरज अनिल चौधरी हे देखील उपस्थित होते