भुसावळ येथे 12 मार्च रोजी होणाऱ्या लेडीज रन साठी नावनोंदणीस सुरुवात”


भुुुुसावळ -जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन दरवर्षी मार्च महिन्यात महिलांसाठी खास मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करीत असते. यावर्षी देखील 12 मार्च रोजी लेडीज इक्वलिटी रनचे ३ किमी, ५ किमी व १० किमी या तीन गटात महिला व मुलींसाठी आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून प्रत्येक सहभागी महिला स्पर्धकास आयोजकांतर्फे टी-शर्ट, पदक, इ प्रमाणपत्र दिले जाईल. शिवाय रनिंग दरम्यान रूट सपोर्ट, पेयजलांची व्यवस्था व रनिंग नंतर पौष्टिक नात्याची व्यवस्था असेल. शिवाय रन आधी वार्म अप व रनिंग नंतर स्ट्रेचिंग एक्सरसाइज झुंबाद्वारे घेण्यात येईल. त्याशिवाय विविध आकर्षक बक्षिसे देखील स्पर्धकांसाठी आहेत.
नावनोंदणी ऑनलाइन व प्रत्यक्ष फॉर्म भरून ऑफलाइन पद्धतीने करता येईल. त्यासाठी इच्छुक महिलांनी भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या महिला धावपटूंशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. दर मंगळवारी, गुरुवारी व रविवारी भुसावळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण अर्थात डि. एस. ग्राउंड येथे रनिंगच्या सरावानंतर सकाळी ७.०० ते ७.३० या वेळेत देखील नाव नोंदणी करता येईल.याशिवाय नावनोंदणीचे फॉर्म डाॅ.चारुलता पाटील (९८२३७९९७५८) यांचे सुप्रभा हॉस्पिटल ,जळगाव – यावल रोड ,पंचमुखी हनुमान मंदिराजवळ ,भुसावळ व डॉ. नीलिमा नेहेते ( 9325638717 )यांचे नेहेतेहॉस्पिटल,जामनेर रोड,भुसावळ येथे देखील उपलब्ध आहेत. शिवाय ऑनलाइन नोंदणीसाठी गुगल फॉर्म उपलब्ध असून त्यासाठी प्रवीण पाटील (९४२२७७२१७८ ) यांना संपर्क करता येईल अशी माहिती भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे प्रमुख प्रा. प्रवीण फालक यांनी कळविली आहे.