भुसावळ : पुण्यात नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र ऑलिंपिक गेम्समध्ये भुसावळातील 11 खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्यानंतर पाच गोल्ड, चार कांस्य पदक पटकावले. पुणे येथील महाराष्ट्र ऑलिम्पिक बॉक्सिंग स्पर्धेत जळगाव जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या जिल्ह्यातील विविध बॉक्सिंग संघाकडून गेलेल्या स्पर्धकांनी यशस्वी कामगिरी केली. भुसावळच्या पाच खेळाडूंनी गोल्ड तर दोघांनी रौप्य व चार जणांनी कांस्यपदक विविध वजनी गटांमध्ये पटकावले.

या खेळाडूंची चमकदार कामगिरी
प्रियंका शिरसाळे 46-48, पवन साळवे 46-48, मोहम्मद साजीद 51-54, नागेश खरारे 63.5-67, कालिचरण खरारे 75.80, रौप्य पदक विजेत्यात आशुतोष गौतम 67-71, वैशाली वाकवडे 52-54 तसेच कास्यपदक विजेते प्रथमेश आव्हाड 46-48, संकेत तायडे 51-54, सिद्धार्थ सपकाळे 57-60, अर्जुन गुप्ता 54-57 या गटात विजयी झाले. या खेळाडूंना
क्ले बॉक्सिंग क्लबचे कोच पवन शिरसाट, बॉक्सिंग अकॅडमीचे अर्जुन खरारे, सम्राट बॉक्सिंग क्लब प्रशिक्षक प्रकाश जाधव, सीसीसीपी कोच छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंगचे प्रशिक्षक, एनआयएस कोच नरेंद्र अरुण मोरे, धीरज सोनवणे, अनिल सपकाळे, रोहित जंजाले आदींचे मार्गदर्शन लाभले.


