भुसावळ – शहरातील जय मातृभूमी मंडळा तर्फे दरवर्षी मकर संक्रांत निमित्त बाळ गोपाळांना पतंग वाटप करण्यात येत असते. या वर्षी देखील जय मातृभूमी मंडळातर्फे बाल गोपाळांना 2000 पंचांगचे वाटप करण्यात आले . शहरातील जय मातृभूमी चौकामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार संजय सावकारे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक मनोज बियाणी

, माजी नगरसेवक किरण कोलते यांच्या हस्ते बालगोपालांना 2000 पतंग वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार संजय सावकारे यांनी शहरवासीयांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच बालगोपालांनी पंतग उडवितांना स्वतः ची काळजी घ्यावी. आपल्या पासुन कोणाला हि इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच नायलॉन मांज्याचा कोणीही वापर करु नये. असे आवाहन केले.


