भुसावळ (प्रतिनिधी)
भुसावळ विभागातील भुसावळ देवळाली नाशिक शटल मधून पडलेल्या प्रवाशाचे जीव वाचवणाऱ्या गाडीचे चालक व गार्ड यांचा उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शुक्रवार 7 फेब्रूवारी रोजी भुसावळ डीआरएम कार्यालयात प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देवून गौरव केला .
देवळाली – भुसावळ शटल गाड़ी क्रमांक – 51181 या गाडीने प्रवास करणारे पाचोरा येथील प्रवासी राहुल पाटिल हे प्रवास करीत असतांना यांचा परधाड़े – माहेजी दरम्यान पाय घसरून गाड़ी मधून पडले . ही बातमी सहप्रवाशांना समजली असता त्यांनी गाड़ी चैन पुलिंग करुन गाड़ी थांबविली मात्रव गाड़ी ही घटने पासून 2 किलोमीटर पुढे गेली होती . या घटनेची माहिती गाड़ीचे गार्ड आर बी पारधे यांना दिली असता त्यानी क्षणाचाही विलंब न करता गाड़ी चे लोको पायलट ए के पांडे याना माहिती दिली . पांडे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकारी यांचेशी सपर्क साधला व वृत्त सांगितले . वरिष्ठ अधिकारी यांनी होकर देताच ही गाड़ी 2 किलोमीटर मागे नेण्यात आली .आणि जखमी प्रवाशाला वाचविन्यात यश मिळाले या प्रवाशाला जळगाव येथे खाजगी दवाखाना मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. या गार्ड अणि लोको पायलट यांनी समय सूचकता व सतर्कतेने कार्यकेल्या बद्दल मंडल रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांनी दखल घेत कौतुक केले व गार्ड आर बी पारधे , लोको पायलट ए के पांडे , सहायक लोको पायलट नीरज पांडे यांना मंडल रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांनी प्रशस्तीपत्र आणि 1000/- रु रोख रक्कम देऊन सन्मानित केले या प्रसगी वरिष्ट मंडल विद्युत अभियंता पि के भंजा , वरिष्ट मंडल वाणिज्य प्रबंधक आर के शर्मा , सहायक परिचालन प्रंबधक रामेकर आदि उपस्थित होते .



