भुसावळ विभागात सौर उर्जा परियोजने अंतर्गत रेल्वे मार्गाजवळील रेल्वेच्या जागेवर सौर उर्जा प्रकल्पाची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी विभागातील मुर्तीजापूर, अकोला किवा इतर ठिकाणी योग्य असलेल्या जागांची चाचपणी करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. तसेच मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग हा मुंबई-कलकत्ता या शहरांना जोडणारा सुवर्ण चतुष्कोण असल्यामुळे विभागातील या मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग व आरओबीच्या नुतनीकरण आगामी तीन वर्षात करण्यात येणार आहे. गाड्यांची गती १६० किमी प्रती तास वेगाने होणार असून सद्या ते नियोजन १३० किमी प्रती तास नुसार सुरु आहे. ती वाढविण्यासाठी विभागातील सिग्नलिंगसाठी ४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर वर्षभरात सर्वच पॅसेंजर गाड्यांचे मेमू गाड्यांमध्ये परिवर्तन करण्यात येईल व मेेमू (कारशेडची ) दुरुस्ती कारखाना निर्मिती सप्टेंबर २०२१ पर्यंत होणार , देशभरातील शंभर रेल्वे मार्गावरून १५० खाजगी तेजस ट्रेन धावणार असून त्यातील पाच गाड्या या भुसावळ विभागातून धावणार आहे असल्याची माहिती डिआरएम विवेककुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील डिआरएम कार्यालयात दि. ६ रोजी ५ वा पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी सिनियर डिसीएम आर.के. शर्मा, अभियंता राजेश चिखले, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार, वाणिज्य निरीक्षक जीवन चौधरी उपस्थित होते. याशिवाय धुळे-नरडाणा या ५० कि.मी.नवीन मार्ग. भुसावळ- जळगाव दरम्यान तीसर्या व चौथ्या रेल्वे मार्गासाठी ६५ कोटी. इंदुर -मनमाड नवीन मार्ग, मनमाड जळगाव थर्ड रेल्वे लांईन २०५ कोटी यासह विविध विकास कामें व सर्वेक्षणासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतून अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.विभागातील भुसावळ, जळगाव, बर्हाणपुर, अकोला, मकापूर,शेगाव, नाशिक मनगाड, नांदगाव याठिकाणच्या रेल्वे जागा वाचविण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने जागांवर संरक्षण भिंती तयार करण्यात येत आहे. यापूर्वी १२ते १५ कोटी रुपयांचा खर्च झाला असून आगामी काळातही तेवढाच खर्च करण्यात येणार आहे .यापूर्वीची पिंक बुक पद्धत आता बंद झाली असून अंब्रेला पद्धत्तीने वर्क होत असल्याचे समाधान व्यक्त केल या वर्षी केंद्रीय अर्थसंकल्पात विभागातील कामांना अधिक गती व चालना मिळावी तसेच नवीन प्रकल्प सुरु व्हावे म्हणून भरघोस निधी मिळाला असल्याने सौर ऊर्जा प्रकल्प निर्मिती करण्यात येणार असून लवकरच सौर ऊर्जेवर रेल्वे धावणार असल्याची माहिती दिली याकरीता भुसावळ विभागात मूर्तिजापुर , अकोला यासह चाळीसगाव याठिकानी सौर ऊर्जा प्रकल्प निर्मिती होणार आहे . प्रत्येक 40 किलोमिटरच्या अंतरावर रेल्वेचे असलेले ट्रैक ट्रैक्शन सर्विस सेंटरच्या ही विज निर्मिती सौर प्रकल्पावर होणार आहे .
पूर्वी प्रत्येक विभागाला स्वतंत्र निधी होता मात्र केंद्र सरकारने काही बदल केले असून रेल्वे प्रशासनाला संपूर्ण भारतात अम्ब्रेला वर्क म्हणून निधी उपलब्ध करून दिला असून यापूर्वीची पिंक बुक पद्धत आता बंद झाली आहे व अंब्रेला पद्धत्तीने वर्क होत असल्याचे समाधान व्यक्त केले.
भुसावळात मंजूर असलेला मेमू दुरुस्तीचा कारखाना सप्टेंबर 2021 पर्यंत कार्यान्वित होईल, तर.येत्या वर्षाच्या आत सर्व पैसेंजर गाड्यांऐवजी मेमू ट्रेन धावणार असल्याचा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला
देशभरातून सुमारे शंभर रेल्वे मार्गावरून 150 खाजगी तेजस ट्रेन धावणार असून त्यातील पाच भुसावळ विभागातून धावतील. त्यात मुंबई-नागपूर, मुंबई-बनारस, पुणे-पटना, नागपूर-पुणे, सुरत-बनारस या गाड्यांचा समावेश असून वेस्टर्न झोनमधून मुंबई-अहमदाबाद ट्रेन धावणार आहे
भुसावळ नरखेड बडनेरा या मेंमू ट्रेन मधून प्रवासी सामानांची चोरी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे . ही ट्रेन प्रवाश्याच्या सोई व सुविधेकरीताच केली असून मेमू ट्रैनला लावण्यात आलेल्या साहित्याची (सामानाची )नळ, लाईट्स आदी वस्तुंची तोडफोड करून चोरी करु नये , रेल्वे ही आपलीच राष्ट्रीय संपत्ती आहे .यांची खबरदारी घ्यावी असे आवाहन डीआरएम यांनी यावेळी केले . केंद्रीय अर्थसंकल्पात भुसावळ विभागाला यंदा भरघोस निधी मिळाला असून यामध्ये
भुसावळ विभागात धुळे (बोरविहीर)- नरडाणा ५०.६ किमी रेल्वेमार्गासाठी एक कोटी, भुसावळ जळगाव २४.१३ किमी तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी १० कोटी, जळगाव-भुसावळ-२४.४६ किमीसाठी ५५ कोटी,
मनमाड-जळगाव १६० किमीसाठी २०५ कोटी तसेच जळगाव, भुसावळ, वर्धा, नागपूर, आमला, इटारसी या लाँगर लुप लाईनसाठी ४० कोटी व भुसावळ बडनेरा दिशेच्या अतिरिक्त आईस लँड फलाटासाठी५ कोटी,
भुसावळ मंडळातल्या सर्वसामान्य गेटसाठी एक कोटी, जळगाव लेव्हल क्रॉसिंग नंबर १४७ आरओबीसाठी दोन कोटी, भुसावळ -बडनेरा लेव्हल क्रॉसिंग नंबर ७या आरओबीसाठी ९ कोटी, भुसावळ-बडनेरा (नांदुरा यार्ड) लेव्हल क्रॉसिंग २० नंबर साठी ३ कोटी, बडनेरा बॅगन रिपेअर कारखाना निर्माण साठी ९९ कोटी, जळगाव-भुसावळ त्या दिशेने २.४४ मीटर फुट ओवर ब्रिजच्या निर्माण कार्यासाठी ३.३ कोटी, इगतपुरी-भुसावळ लेव्हल क्रॉसिंग १२६ साठी ३ कोटी, भुसावळ-खंडवा लेव्हल क्रॉसिंग १४९,१६२,१६९ यावर ओव्हर ब्रीजसाठी ८.३ कोटी, याशिवाय भुसावळ विभागातील परिसरात अतिक्रमण होऊ नये यासाठी संरक्षक भिंत निर्माण करण्यासाठी ही निधी उपलब्ध करण्यात आला आहे.



