शिक्षकांसाठी क्रीडा परिषद स्तुत्य उपक्रम दैनंदिन कामातून मिळते शरीराला विश्रांती – आमदार संजय सावकारे

भुसावळ (प्रतिनिधी )-
शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध क्रिडा स्पर्धा आयोजित केल्या जातात मात्र स्पर्धा आयोजित करणाऱ्या शिक्षकांसाठी कोणत्याही प्रकारचे खेळ अथवा कार्यक्रमाचे आयोजन होत नाही त्यामुळे दैनंदिन कामात तणावात असलेल्या शिक्षकांना विश्रांतीसाठी अथवा वातावरण बदलासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन होणे गरजेचे आहे भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळामधील सर्व संघटनांनी आयोजित केलेले क्रीडा स्पर्धा ही स्तुत्य असून अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे असे प्रतिपादन आमदार संजय सावकारे यांनी भुसावळ येथील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केले
भुसावळ तालुका जिल्हा परिषद शाळेतील सर्व संघटनांच्या वतीने क्रीडा परिषदेचे ७ फेब्रूवारी शुक्रवार रोजी आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भुसावळ पंचायत समितीचे सभापती मनीषा पाटील, सदस्य सुनील महाजन, जिल्हा परिषद सदस्य सुरेखा कोळी, बियाणी मिलिटरी स्कूलच्या संगीता बियाणी, भालचंद्र पाटील, सुनील कोळी, गट शिक्षणाधिकारी तुषार प्रधान, विस्ताराधिकारी रागिणी चव्हाण, डायट चे अधिव्याख्याता शैलेश पाटील, बियाणी मिलिटरी स्कूलचे मुख्याध्यापक एम डी पाटील, केंद्रप्रमुख संजय श्रीखंडे, नलिनी झांबरे, बि डी बोदडे आदी उपस्थित होते यावेळी शिक्षकांसाठी धावणे संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धा क्रिकेट स्पर्धा व मूल्यवर्धन प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले परीक्षक म्हणून आर आर धनगर, रमण भोळे, डॉक्टर प्रदीप साखरे, एस वि पाटील, एच ए पठाण, हिंमत पाटील यांनी काम पाहिले धावण्याच्या स्पर्धेत विजयी स्पर्धक चाळीस वर्ष वरील पुरुष गटात प्रथम संतोष तायडे हतनूर, समाधान जाधव शिंदी, अजय चालसे हतनूर,
चाळीस वर्षे आत पुरुष गटात कमलेश श्यामकुवर बोहर्डी बुद्रुक, प्रदीप तांबोळी कठोरा, रुपेश मेश्राम जाडगाव, धावण्याची स्पर्धा 40 वर्ष आतील महिला प्रथम यामिनी फालक मानपुर, दीपमाला कोल्हे तळवेल, भाग्यश्री चौधरी कुऱ्हे , चाळीस वर्ष वर महिला धावण्याचा गटात प्रथम ज्योती वानखेडे वझरखेडे, ज्योती सैंदाणे टहाकळी, मनीषा घुले दिपनगर स्पर्धेच्या नियोजनासाठी समन्वय समितीचे अध्यक्ष प्रदीप सोनवणे, गजानन नारखेडे, सुधीर तायडे, राजेंद्र ढाके, मीरा जंगले, विलास तायडे, गणेश फेगडे, नामदेव महाजन प्रमोद गांधेले सूर्यकांत घुले आद कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान जाधव यांनी तर आभार दीपक पाटील यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *