महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना जिल्हा संपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न ;


जळगांव – महाराष्ट्र पोलिसांसाठी व पोलीस परिवारासाठी झटणारी तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना जळगाव जिल्हा संपर्क कार्यालयाचे आज जळगाव शहराचे महापौर सौ.जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते भास्कर मार्केट येथे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना ही संपूर्ण राज्य भरात पोलिसांच्या व त्यांच्या परिवाराच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर असून संघटनेच्या माध्यमातून अनेक पोलीस पाल्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातात. हाच हेतू समोर ठेऊन जळगांव जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी जळगांव जिल्हा संपर्क प्रमुख कुणाल मोरे यांच्यासह जिल्हाध्यक्ष राकेश कांबळे, प्रा. पंकज नाले, आरिफ पिंजारी, अमित बच्छाव, अकील शेख, रशीद तडवी, दिलीप साळुंखे, चेतन निंबोळकर, समीर शेख, कन्हैया मोरे, भूषण सुरळकर, खलील खाटीक, ललित वेळीस तसेच भास्कर मार्केटचे सर्व व्यावसायिक उपस्थित होते.