धावत्या गाडीत धोक्याची साखळी ओढणे दंडात्मक गुन्हा : भुसावळ विभागात जून 2022 पर्यंत एकूण 1,481 व्यक्तिवर कारवाई : 8,95,645 रुपये दंड वसूल ;

भुसावळ – धावत्या गाडीत योग्य कारणाशिवाय धोक्याची साखळी ओढणे दंडात्मक गुन्हा असून भुसावळ रेल्वे विभागाने जनजागृती मोहीमें अंतर्गत जून 2022 पर्यंत कलम 141 नुसार एकूण 1481 व्यक्तिवर कारवाई एकूण 8,95,645 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे .
योग्य कारणाशिवाय ट्रेनमध्ये एसीपी (अलार्म चेन पुलिंग) करणे हा दंडनीय गुन्हा आहे. योग्य कारणाशिवाय एसीपी (अलार्म चेन पुलिंग) केल्याबद्दल रेल्वे कायद्याच्या कलम 141 अंतर्गत कारवाई केली जाते. ज्यामध्ये आरोपीला रु. 1000/- पर्यंत दंड किंवा एक वर्षापर्यंत कारावास किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे.
एसीपी प्रतिबंधाबाबत प्रवाशांना जागरूक करण्यासाठी आरपीएफकडून वेळोवेळी सूचना केल्या जातात .
भुसावळ मंडळातर्फे सन 2022 मध्ये (जून महिन्यापर्यंत) जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.आरपीएफ रेल्वे कायद्याच्या कलम 141 अंतर्गत एकूण 1,481 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून दंड वसूल करण्यात आला आहे .