प्रभाग ८ च्या नागरिकांना शिधापत्रिकेचा १२ अंकी क्रमांक देण्यास सुरुवात… शिवसेनेचे तालुका संघटक प्रा. धीरज पाटील यांचा नागरिकांसाठी शासकीय योजना आपल्या दारी उपक्रम…


भुसावळ – शहरातील प्रभाग ८ मधील भोई नगर, श्री नगर, गणेश कॉलनी, मोहित नगर, हुडको कॉलनी, भिरूड कॉलनी, अयोध्यानगर, स्वामी विहार, मुक्ताई कॉलनी, अष्टविनायक कॉलनी भागातील नागरिकांनी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा. धीरज पाटील यांनी आयोजित केलेल्या शिबिरात रेशन कार्डचा १२ अंकी क्रमांक मिळवण्यासाठीची मागणी केली होती. या शिबिरात नागरिकांनी दिलेली कागदपत्रे तालुका संघटक प्रा. धीरज पाटील यांनी तहसील कार्यालयात सादर केली व पाठपुरावा सुरु केला. त्यानुसार वरील भागातील ४८ शिधापत्रिका धारकांना ११ अंकी क्रमांक आणि ३७ शिधापत्रिका धारकांना १२ अंकी क्रमांक भुसावळ तहसीलच्या पुरवठा विभागाच्या सहकार्यातून मिळवून देण्यात आले आहे.

प्रभागातील नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा :  प्रा. धीरज पाटील
प्रभाग ८ मधील अनेक नागरिकांचा शिधापत्रिकेचा १२ अंकी क्रमांक डिलीट झाला आहे. त्यांना तो पुन्हा मिळवून देणे, त्याचप्रमाणे रेशनकार्डमध्ये नाव वाढवणे, नाव कमी करणे, रेशनकार्डचे नुतनीकरण करणेसाठी कागदपत्रे जमा केली जात आहे. परिसरातील पात्र नागरिकांसाठी संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना व इतर शासकीय योजनाची कागदपत्रे तयार करून दिले जात आहेत, प्रभागातील नागरिकांसाठी शासकीय योजना आपल्या दारी उपक्रम केला आहे. शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रा. धीरज पाटील यांनी केले आहे.