वरणगाव – शहरात प्रत्येक प्रभागात शिवसेना पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी भुसावळ विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश राणे यांनी गुरुवार दि. 30 रोजी सायंकाळी वरणगावमध्ये प्रत्येक प्रभागात फिरून बैठका घेऊन शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.

रावेर लोकसभाचे संपर्क प्रमुख विलास पारकर यांच्या आदेशाने जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव शहरातील 1 ते 10 प्रभागात गुरुवारी सायंकाळी भुसावळ विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गावातील शिवसैनिकांशी प्रभागात जाऊन संघटना बाबत मार्गदर्शन आणि आगामी होणाऱ्या निवडणुकीबाबत चर्चा विनिमय करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांचा जोशपूर्ण उत्साहपूर्ण उत्तम प्रतिसाद मिळाला तसेच आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचेही शिवसैनिकांनी यावेळी संपर्क प्रमुख सुरेश राणे यांना सांगितले.
यावेळी जिल्हा संघटक विलास मुळे, भुसावळ विधानसभा क्षेत्राप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक धीरज पाटील, उप तालुकाप्रमुख सुभाष चौधरी, शहरप्रमुख संतोष माळी, निलेश ठाकूर, युवा जिल्हाधिकारी चंद्रकांत शर्मा, मुस्लिम समाजाचे नेते सय्यद जाफरअली उर्फ हिप्पीशेठ, अल्पसंख्याक संघटक सईद मुल्लाजी, तालुका अल्प संघटक मोहसीन खान, उपशहरप्रमुख राम शेटे, अशोक शर्मा, माजी उपशहर प्रमुख सुनील भोई, शाखा संघटक संजीव कोळी, उमाकांत झांबरे, पंकज चौधरी, फिरोज खान, प्रशांत पाटील, पंकज पाटील, विक्की मोरे, अतुल पाटील, कृष्णा पाटील, मनोज देवगिरकर, पवन चौधरी, लक्ष्मण निंबाळकर, किरण माळी, बाळा माळी, पवन माळी, भूषण माळी, रितेश माळी, शेख सुफियान, मयूर शेटे, नितीन पाटील, राहुल वंजारी, दिपक शेडके यांच्यासह प्रभागनिहाय पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


