भुसावळ:- येथील दादासाहेब देवीदास नामदेव भोळे महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त
ऑनलाईन कॉमन योग प्रोटोकॉल शिबिराचे आयोजन दि 07ते 21 जून 2022 दरम्यान आयोजन करण्यात आले होते परंतु साधकांच्या मागणी नुसार अजून 09 दिवस वाढविण्यात आले व दि 30 जुन 2022 रोजी सकाळी 07.00 वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ चे सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ आर पी फालक यांचे प्रमुख उपस्थितीत समारोप करण्यात आले सदर प्रसंगी प्राचार्य डॉ आर पी फालक यांनी समारोप प्रसंगी मार्गदर्शनात सांगितले की शरीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी या शिबिरात विविध योग आसनाचे प्रकार शिकवले, तसेच विविध व्याधी बरे कशा प्रकारे करता येतील रक्तदाब, डायबेटीस, पोंडिलिसिस, दमा व घशाचे आजार, पोटातील विकार, स्थूलता, हे आजार नियंत्रणात कसे राहील व पूर्ण बरे कसे होतील यावर जास्त भर दिला तसेच ध्यान धारणा करून मनाचे संतुलित कसे ठेवावे यावर सुद्धा जास्त भर दिला आहे साधक यांनी फिटनेससाठी दररोज नियमितपणे योग व व्यायामाचा सराव सुरू ठेवावा असे सांगितले
मनोगतात योग साधक प्रा डॉ दयाघन एस राणे यांनी सांगितले की दैनंदिन जीवनातील हालचालींच्या विरुद्ध हालचाली केल्या नंतर शरीरामध्ये विरुद्ध ताण निर्माण होतात आणि त्या द्वारे शरीर सुस्थिती मध्ये राहते. तसेच योगासने करताना श्वसनाच्या गती चे भान राखले गेल्यास योगाभ्यासांचा अधिक चांगला फायदा होतो म्हणून शास्त्रशुद्ध पद्धतीने योगाभ्यास केला जातो. उत्तम पद्धतीच्या मार्गदर्शना त्यांनी योगशिक्षिका प्रा सीमा पाटील व योग शिक्षक श्री देवेंद्र पाटील यांचे आभार व्यक्त केले.
डॉ सीमा देवेंद्र व श्री देवेंद्र पाटील यांनी झूम अँप च्या माध्यमातून ऑनलाईन योग शिबिरात प्रथमतःह प्रार्थना,ओंकार, सूक्ष्म व्यायामाद्वारे शारीरिक हालचाली व विविध योगासने, ध्यान, प्राणायाम शिकविले व त्यापासून होणारे फायदे विविध आजारापासून कसा बचाव करता येईल या संबंधित आसने घेतली व मेडीटेशन करून घेतले कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा डॉ संजय चौधरी यांनी सूत्रसंचालन व आभार प्रा अनिल सावळे यांनी मानले.
सदर कार्यक्रमासाठी
यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, मित्र परिवार यांनी सहभाग नोंदविला, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ आर पी फालक, तसेच क्रीडा समिती सदस्य व सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी सहभाग नोंदवून सहकार्य केले असे प्रसिद्ध प्रमुख प्रा डॉ संजय डी चौधरी यांनी कळविले आहे.



