भुसावळ – स्वा. सावरकर मध्यवर्ती राष्ट्रीय प्रबोधन संस्था भुसावळच्यावतीने स्वा. सावरकरांची 139 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी लघुउद्योजक मेळावा संपन्न झाला .
शहरातील लघुउदयोजकांचे एक सूत्रबद्ध संघटन करून लघुउद्योजकना सर्वोतपरी सहकार्य करण्यासाठी संस्था उद्योजक व ग्राहक यांच्यात मध्यस्थाची भूमिका बजावून उदयोग वाढीसाठी सहकार्य व्यवसाय मार्गदर्शन शिबीर, व्यवसाया संदर्भात खरेदी, विक्री चे प्रदर्शन या सारखे कार्यक्रम आयोजित करणार आहे. या वेळी जे. एन. पुराणिक सर व जेष्ठ रमेश पालखे हस्ते छत्रपती शिवाजीमहाराज व स्वा. सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच समस्त ब्राह्मण समाज व परशुराम जन्मोत्सव समितिद्वारा श्री राम मंदिरात सावरकर यांच्या प्रतिमेस समिति चे अध्यक्ष व जेष्ठ समाज बंधु यांच्या हस्ते माल्यार्पण करून एकमेकांना पेढ़े देवून सावरकर यांची जयंती साज़री करण्यात आली.
श्री पुराणिक सरांनी संस्थेच्या वनप्रास्थश्रम, गोशाळा, आध्यत्म केंद्र, लघुउद्योगकेंद्र व वाचनालय या सेवाभावी प्रकल्पा विषयी माहिती दिली. तर संस्था सचिव गणेश वढवेकर यांनी जामनेर रोड वरील नवशक्ती आर्केड जवळील स्वा. सावरकर चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी नगरपरिषद भुसावळकडे परवानगी अर्ज दिल्याचे व लवकरच परवानगी मिळणार असल्याचे यावेळी सांगितले.
कार्यक्रमात परशुराम सेवा समिती चे उमाकांत शर्मा, भूषण वैद्य, जयप्रकाश शुक्ला दीपक पाथरकर, गौरव हिंगवे, रमाकांत भालेराव, रमाकांत केऱ्हाळकर, सावरकर मंडळाचे शंभूगोडबोले, निरज तिवारी,संजय बोचरे, यश इंगळे, विनोद भालेराव, श्रीकांत वढवेकर, सौ रागिणी पुराणिक सौ अंजली कवठाळकर, प्रज्ञा संत सौ. लक्ष्मी वढवेकर व असंख्य सावरकर प्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमा नंतर खान्देशी मेनू डाळ गंडोरी सह सहभोजन संपन्न झाले. दिनेश जोशी कुटुंबाने या साठी अथक परिश्रम घेतले.




