नांदगाव स्थानकानजिक एन एम जी वँगनचा अपघात : बोगी घसरली : सुदैवाने अनर्थ टळला :


भुसावळ – भुसावळ विभागातील नांदगाव स्टेशन जवळ मेन लाईनवर दी. 29.5.2022 रोजी रात्री 12.30 वाजे दरम्यान एन एम जी वँगन रुळावरुन इंजिन पासून दूसरी बोगी घसरली . यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही.
सकाळी 3 वाजता रेल्वे ट्राफिक सुरू झाली. यामुळे गाड़ी संख्या 11034- दरभंगा – पुणे एक्सप्रेस , 12618- निज़ामुद्दीन –एर्णाकुलाम मंगला एक्सप्रेस ,12112 अमरावती – मुंबई एक्सप्रेस , 12810 हावड़ा – मुंबई मेल ,12106 – गोंडिया – मुंबई विदरभा एक्सप्रेस ,12138- फिरोजपुर – मुंबई पंजाब मेल, 12136- नागपुर –पुणे एक्सप्रेस या गाड्या सुमारे एक ते दोन तास उशीराने धावल्या .