निळू पंछी म्हणजे नीतिमूल्ये जपणारा देवभोळा माणूस : शिवसेना माजी तालुका प्रमुख, निळकंठ फालक यांना मित्रपरिवारासह चाहत्यांनी वाहिली श्रद्धांजली ;


भुसावळ – निळू पंछी म्हणजे नीतिमूल्ये जपणारा देवभोळा माणूस असे भावोद्गारासह एक ना अनेक आठवणीं सांगून शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व
मित्रपरिवारासह चाहत्यांनी शिवसेना माजी तालुका प्रमुख, निळकंठ फालक यांना आयोजित शोकसभेत श्रद्धांजली वाहिली .
येथील शिवसेना माजी तालुका प्रमुख, नगरसेवक तथा माजी नगराध्यक्षा श्रीमती माधुरी फालक यांचे पती स्व. निळकंठ सुदाम फालक यांचे नुकतेच हॄदयविकाराने दुःखद निधन झाले.
निळकंठ फालक उर्फ पंछी यांच्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीतील योगदान विचारात घेऊन त्यांचे स्मृतीप्रीत्यर्थ सर्व पक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन २८ रोजी सायंकाळी विठ्ठल मंदिरा समोर, विठ्ठल मंदिर वार्ड,भुसावळ करण्यात आले.
प्रारंभी स्व. नीळकंठ फालक यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरानी माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले .
आपल्या मनमिळावू मृदु व भोळया स्वभावाने अल्पावधित सर्वांच्या मनावर अधिराज्य करून निळू भाऊ उर्फ पंछी यांनी अनेकांची मने जिंकली होती .अत्यंत लोकप्रिय असलेल्या पंछी यांनी सामाजिक शैक्षणिक व राजकीय वाटचालीत महाविद्यालयीन निवडणुकी पासून समाजसेवेत सक्रिय होत शिवसेनेच्या माध्यमातून नगरसेवरक व पत्नी माधुरी यांना नगराध्यक्ष पदापर्यंत कार्य केले . शिवसेनेत एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून सांगतांना त्यांचा जो रुबाब व स्वाभिमान होता त्या क्षणासह अनेक आठवणी यावेळी प्रत्येकाने सांगितल्या . त्यांच्या अचानक जाण्याने भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली. ईश्वर मृतात्म्यास शांति देवो अशी आदरांजली वाहिली .
प्रसंगी सर्वानी साश्रु नयनानी स्व. निळू भाऊ उर्फ पंछी यांच्या आठवणी सांगीतल्या तेव्हा उपस्थितांचे मन गहिवरले व सर्वाचे डोळे पाणावले होते .
या सर्व पक्षीय शोकसभेस शिवसेनेचे माजी आमदार दिलीप भोळे , कॉंग्रेसचे माजी आमदार निळकंठ फालक , रा कॉच्या रोहिणी खडसे – खेवलकर , माजी नगराध्यक्ष रमण भोळे ,अजय भोळे , प्रमोद सावकारे , पिंटू कोठारी ,विंष्णु चौधरीं , सुधीर पाटिल , युवराज लोणारी, रॉ कॉ माजी जि प सदस्य रविंद्र पाटिल , उमेश नेमाडे , रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख रमेश मकासरे , रिपाई जिल्हाप्रमुख नगरसेवक राजू सूर्यवंशी , पीआरपी महामंत्री जगन सोनवणे , कॉंग्रेस अल्पसंख्यक अध्यक्ष मो मुन्नवर खान ,माजी नगराध्यक्ष नीळकंठ भारबे , हरीष फालक, सुहास फालक, प्रा प्रशांत पाटिल , देवेंद्र पाटिल , रेल कामगार सेनेचे ललित मूथा ,माजी नगरसेवक दीपक धांडे , अँड निर्मल दायमा , शहरप्रमुख बबलु ब-हाटे , महिला आघाडी पूनम ब-हाटे , नामदेव ब-हाटे , यांचेसह प्रा दिनेश राठी , देवा वाणी , पुरुषोत्तम नारखेडे , प्रमोद नेमाडे , प्रा सुनील नेवे , वसंत पाटिल , किरण कोलते , पदाधिकारी , प्रतिष्ठित नागरिक , यांचेसह नीळकंठ सुदाम फालक मित्र परिवार व स्थानिक नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते .