भुसवाळ : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील अणुऊर्जा औष्णिक केंद्रातील सतराशे कर्मचारी विविध मागण्यांसाठी दोन दिवसीय लाक्षणिक संपावर आज मध्यरात्रीपासून जात आहे, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.दिपनगर येथे अनु ऊर्जा औष्णिक प्रकल्प शासनाच्या वतीने सुरू आहे ,या प्रकल्पातील सतराशे कर्मचारी आज मध्यरात्रीपासून दोन दिवसाच्या लाक्षणिक संपावर जात आहे. महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांनी अनु ऊर्जा औष्णिक केंद्रातील कर्मचाऱ्यांचा खाजगीकरण करणाचा घाट घातला आहे .यासह इतर मागण्यांसाठी हे सतराशे कर्मचारी दोन दिवसाच्या लाक्षणिक उपोषणावर जात आहे .शासनाने त्वरित मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन कर्मचारी करणार असल्याचेही या वेळी कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे . यावेळी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली



