भुसावळ – शहर व तालुका शिवसेने तर्फे केंद्र शासनाच्या महागाई विरोधात खाद्य तेल,पेट्रोल, डिझेल, गॅस दिनांक २९/०३/२०२२ रोजी प्रांत कार्यालयावर सकाळी १० वाजता जनहितार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे.

तरी भुसावळ तालुका व शहरातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी व युवा सेना,महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी जास्तीत जास्त संख्येने प्रांत कार्यालया जवळ सकाळी ठिक १० वाजेला उपस्थित राहावे , असेआवाहन करण्यात आले आहे .
हे आंदोलन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,ना.गुलाबराव पाटील (पालक मंत्री) आमदार तथा माजी जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शनात व जिल्हा प्रमुख समाधान महाजन (सर), जिल्हा संघटक विलास मुळे,जिल्हा उप कार्यालयीन प्रमुख उत्तमराव सुरवाडे,अल्प संख्यांक प्रमुख शेख इलीयास (सर),भुसावळ विधान सभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे,तालुका संघटक धीरज पाटील (सर)यांचे नेतृत्वात होणार आहे.तरी सर्व शिवसैनिकांनी वेळेवर हजर राहावे असे आवाहन भुसावळ शहर प्रमुख यांचे तर्फे करण्यात आले आहे.


