भुसावळ– येथील टपाल कर्मचा-यांच्या आज दि.28-3-22 पासून दोन दिवसांचा देशव्यापी संप सुरु झाला आहे. यामध्ये संघाची हाक N.F.P.E. वर्ग-३ व ४ या संघटनेने दिलेली आहे.

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागणी खालील प्रमाणे आहे. जुनी पेन्शन योजना परत सुरू करण्यात यावी.कर्मचान्यांना कोरोना काळातील थकीत 18 महीन्यांच्या महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कम त्वरीत देण्यात यावी.कोरोना काळात मरण पावलेल्या कर्मचा-यांच्या वारसांना त्वरित अनुकंपाच्या तत्वावर नोकरीत सामावून घेण्यात यावे.टपाल विभागाचा खाजगीकरण करण्याचा निर्णय त्वरीत रद्द करावा इतर मागणी सहित आज सकाळी भुसावळ प्रधान डाकघर येथे सकाळपासून कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.
याप्रसंगी संपात कॉ.लक्ष्मण माळी, सचीव NPPE वर्ग तीन कॉ.सुरेश जाधव सचिव N.F.P.E. वर्ग-पोस्टमन कॉ. अनिल. पी.गजरे,कॉं- संतोष तायडे काँ.श्रीनिवास मेहरुणकर, कॉ. नरेंद्र पाटील.कॉ.संजय सपकाळे.कॉ-विजय शितोळे.काँ रविंद्र सोनार,कॉ. मंगेश शिंदे,कॉ.सतीष पाटील, कॉ.महेश कोल्हे,कॉ.गोविंदा पाटील,कॉ-संगिता शिंदे काँ- सुषमा नेमाडे,काँ- रूपाली नायदे,कॉ- मनोज नेहेते.काँ-प्रदीप मेढे, कॉ.सागर इंगळे,कॉ.अरुणा बाविस्कर कॉ. केदारनाथ देवरे, विनोद कासार,कॉ.सुप्रिया तावरे आणी इंतर कर्मचारी संपात सहभागी आहेत.


