भुसावळ – रंगपंचमी निमित्त टीळा होळी
यासह महिलांच्या विविध सुप्त कलागुणांचा वाव मिळावा तसेच त्यांना एक उत्तम व्यासपीठ मिळावे आनंद मिळावा, यासाठी शहरातील महिला समन्वय व साईलीला महिला बचत गट ,हिरकणी महिला मंच, मानवतकर बहुउद्देशीय संस्था, सक्षम नारी फाउंडेशन, जाइंट्स वसुंधरा सहेली ग्रुप , ग्राहक कल्याण फाऊंडेशन या संघटनांच्या वतीने रंगपंचमीनिमित्त महिलांसाठी टिळा होळी, हास्य कविता, संगीत रजनी अशा विविध करमणुकीचे खेळ आदीं कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात 135 महिलांनी सहभाग घेतला .

शहरातील लोणारी मंगल कार्यालयात बुधवार २३ मार्च रोजी दुपारी रंगारंग २०२२ कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या सुविद्य पत्नी सौ. ओवी वाघचौरे, डॉ मेहर कृपलानी या उपस्थित होत्या .
प्रसंगी प्रमुख पाहूण्या उपविभागीय पोलिस अधिक्षक यांच्या सुविद्य पत्नी सौ.ओवी वाघचौरे यांनी रंगाच्या विविध छटा यावर भाष्य केले. तसेच श्री संत नामदेवांचा अभंग सुरेख आवाजात सादर केला . तर डॉ.मेहर यांनी फिजिओथेरपी या विषयावर मार्गदर्शन केले
कवयत्री प्रा . राजश्री देशमुख ,सौ.रक्षा भालेराव, सुनिता जोशी, जास्वंदी भंडारी, सुवर्णा गाडेकर,उज्वला बागुल यांनी छान हास्य कविता सादर केल्या याला प्रेक्षकांची दाद मिळाली ग्राहक कल्याण फाउंडेशन तालुका अध्यक्ष उज्वला बागुल यांनी काव्यसंमेलन जबाबदारी व सूत्रसंचलन सांभाळले .
कार्यक्रमात ठेवण्यात आलेल्या खेळात व संगीत रजनीत महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यात सुजाता ढाके,करुणा हेमंत भोकरडोळे,किर्ती ठोके,रुपाली सोनवणे, सुनिता राणे, ललीता चौधरी, सरला मेंढे, सविता मगर,भारती भारती नाथो यांनी बक्षिसे मिळवली कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन व प्रास्ताविक सक्षम नारी फाउंडेशन च्या अध्यक्षा डॉक्टर सुवर्णा गाडेकर यांनी केले तर उपस्थितांचे ऋणी निर्देश महिला समन्वय जिल्हाप्रमुख व साईलीला महिला बचत गट अध्यक्षा सौ जास्वंदी भंडारी यांनी व्यक्त केले. मानवतकर बहुद्देशीय संस्थेच्या डॉक्टर मधू मानवतकर यांनी मौज मस्ती खेळ यांचे नियोजन केले. हिरकणी महिला मंचाच्या अध्यक्षा डॉक्टर वंदना वाघचौरे व डॉ मधु मानवतकर यांनी बक्षीस वितरणाची जबाबदारी सांभाळली . ग्राहक कल्याण फाऊंडेशन अध्यक्षा उज्वला बागुल यांनी हास्य कविता कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. जॉइंटस वसुंधरा सहेली ग्रुपच्या अध्यक्षा सौ महानंदा पाटील , प्रा. भाग्यश्री भंगाळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले
कार्यक्रमाचा समारोप टिळा होळी खेळून व संगिताच्या तालावर मनमुराद जल्लोष करीत नृत्य सादर करून झाला . या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व संघटनांच्या महिलांनी सहकार्य केले.









