वर्धा येथील महिला वकीलांवरील हल्ल्यांचा भुसावळ वकील संघाकडून निषेध :


भुसावळ – वर्धा न्यायालयातील कोर्ट हॉलमध्ये न्यायाधीशांसमोर ॲड.योगिता मुन नामक महिला वकि लांवर साक्ष घेत असतांना आरोपीकडून मागून येऊन चाकू हल्ला करण्यात आलेला आहे.या घटनेचे निषेधार्थ भुसावळ वकील संघातर्फे उपविभागीय अधिकारी प्रांत सो. यांच्याकडे 12वाजता निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला आहे . त्याचप्रमाणे अँडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर लागू करून वकिलांना संरक्षण देण्यात यावे याची मागणी सुद्धा निवेदनात करण्यात आली
यावेळी भुसावळ वकील संघातील अध्यक्ष अँड तुषार पाटील , धनराज मगर उपाध्यक्ष सहसचिव पुरुषोत्तम पाटील,
महिला बारच्या अध्यक्षा अँड जास्वंदी भंडारी ,अँड
कल्पना टेमाणी , अँड सुचिता बैसवाल ,अँड . राजेश उपाध्याय, धीरज शंकपाल एडवोकेट विनोद तायडे, एडवोकेट शुभम गोसावी, एडवोकेट मनीष अहिरे, एडवोकेट उमेश पाटील यांचेसह भुसावळ वकील संघातील सर्व सदस्य उपस्थित होते .