भुसावळ – राज्यस्तरीय महाराष्ट्र स्वाभिमान पुरस्कार मला न मागता मुंबईत मिळाला. आणि तोही महाराष्ट्र गौरव दिना निमित्त. याचा मनस्वी आनंद झाला. निवेदनाच्या निमित्तानं मराठीने मला नावलौकिक दिला. मराठी मातृभाषा आणि माझं नातं मातेसमान आहे. असे प्रतिपादन उपप्राचार्य प्रा उत्तम सुरवाडे यांनी केले.
राज्यस्तरीय महाराष्ट्र स्वाभिमान पुरस्कार मिळाल्याबद्दल भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील सहकारी शिक्षकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
सत्कार पर्यवेक्षिका श्रीमती प्रा. शोभा तळेले, समन्वयक प्रा टी.एस सावंत , प्रा स्वाती पाटील. प्रा. आर एम खेडकर , प्रा. एन . पी. निळे., यांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ.मोहन भाऊ फालक , चेअरमन महेश भाऊ फालक , सचिव विष्णू भाऊ चौधरी, कोषाध्यक्ष संजय जी नाहाटा, सर्व सन्माननीय संचालक मंडळ, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ. एस व्ही पाटील., डॉ.बी एच बऱ्हाटे, डॉ. एन ई भंगाळे डॉ. ए डी गोस्वामी, कार्यालयीन कर्मचारी, श्री भगवान तायडे श्री सचिन पाटील
शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी खास अभिनंदन केले आहे.



