भुसावळात प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे महिला दिनानिमित्त लेखक दरेकर यांचे “पणतीला जपताना’वर व्याख्यान :कर्तृत्ववान महिलांचा गौरव :

भुसावळ – येथील महिला मंडळ व हिंदू जागरण मंच तर्फे जागतिक महिला दिना निमित्ताने लेखक समीरजी दरेकर यांच्या पुस्तकावर
‘पणती ला जपताना’ या पुस्तकावर आधारित व्याख्यान तसेच भुसावळ तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांना सन्मान स्त्रीत्वाचा पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे . या कार्यक्रमांचे आयोजन 8 मार्च मंगळवार रोजी
संतोषीमाता हॉल येथे
दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आले आहे .
‘पणती’ फक्त प्रकाशासाठी नसते, प्रकाश तर ती स्वतः बरोबर आणत असतेच पण त्या प्रकाशा बरोबर मांगल्य, आनंद,परंपरा, नवचैतन्य यांनी भारलेलं वातावरण सोबत आणत असते.पणती फक्त प्रकाश नाही याहून खूप काही जास्त आहे. म्हणून पण’ति’ला आपण जास्त जपायचंय.
ज्ञात अज्ञात अश्या सगळ्याच वादळांमध्ये!!!
पण फक्त तिची काळजी करून वा तिची काळजी घेऊन नव्हे,तर तिलाच जागृत करून,विवेकी करून, समर्थ करून!!!
प्रत्येक मुलगी व स्त्री ही त्या घराचा अभिमान असते.स्त्रीला व तिच्या भावनांना जपणे म्हजेच समाजाला जपणे.शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने घरातील मुली व स्त्रिया बाहेर पडतात त्यातील बर्याच मुलींवर खोट्या आमिष ला बळी पडून स्वतः वर व कुटुंबा वर ओढणारे संकट.. मुलींची होणारी फसवणूक त्यांचे होणारे शारीरिक व मानसिक शोषण, अंधश्रद्धा ला बळी पडणे व अतिशय गंभीर विषय म्हणजे धर्मातरण ….. या सर्व विषयावर भाष्य करणारे, स्त्रियांच्या अडचणी व अनेक संवेदनशील विषय योग्यरीत्या हाताळून समाजा समक्ष सहजपणे मांडणारे पणतीला जपताना या पुस्तकाचे लेखक समीर दरेकर* संवाद साधणार आहे .
तरी सर्व नागरिक बंधू भगिनी बांधवानी या व्याख्यानाचां लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठान मंडळाच्या अध्यक्षा सौ रजनी सावकारे व आयोजकांनीं केले आहे .