भुसावळ:- शहराजवळील महामार्गालगत असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर स्मार्ट व्हिलेज साकेगाव, जळगाव जिल्हा टेनिस बाँल क्रिकेट संघटना व माँनीग सी. सी आयोजित सरपंच चषक सीजन -७ स्पर्धेत पहिल्या दिवशी स्पार्टन ,त्रिमूर्ती व जय महाराष्ट्र संघाने आपले सामने जिंकत विजयी सुरुवात केली.
स्पर्धेचे उद्घाटन हवेत सरपंच चषकाचे कोरीव नाव हवेत उडवून व चेंडू टोलवून आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले,प्रसंगी सरपंच योगिता विष्णू सोनवणे, ग्रामसेवक राकेश मुंडके, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, पंचायत समितीचे माजी सभापती सुनील महाजन, सदानंद उन्हाळे, कृ. उ. बाजार समिती माजी सभापती संजय पाटील, उपसरपंच आनंद ठाकरे, जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल, ग्रा प सदस्य भूषण सिंग राजपूत, कुंदन कोळी, विलास ठोके, अजय चौधरी, अनिल सोनवाल, सुभाष कोळी, माजी सरपंच अनिल पाटील सरपंच पती विष्णू सोनवणे डॉ. दीपक पाटील उपस्थित होते.

पहिला सामना स्पार्टन व जय महाराष्ट्र या संघांमध्ये झाला हा सामना अटीतटीचा झाला यात अखेरच्या ओव्हर मध्ये स्मार्टनने विजय संपादन केले. दुसरा सामना गत सरपंच चषक विजेते जय महाराष्ट्र व जय बजरंग या संघात झाला हा सामना जय महाराष्ट्र संघाने सात गड्यांनी जिंकला. तिसरा सामना त्रिमुर्ती विरुद्ध सत्कार संघांमध्ये झाला हा सामना त्रिमुर्ती संघाने ८५ धावांनी जिंकला.
स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच ला डॉक्टर कैलास ठाकरे यांच्यातर्फे टी-शर्ट, नाना चव्हाण यांच्यातर्फे साईजीवन शॉप तर्फे बँट देण्यात येणार आहे.
संडे झाला फंडे
सरपंच चषकाची सुरुवात रविवारी (संडेला) झाल्यामुळे सुट्टीच्या दिवशी महामार्गावरील मैदानावर प्रेक्षक खचाखच भरलेले होते. प्रेक्षकांनी पहिल्या दिवसातील तिन्ही सामन्याचा आनंद लुटला आपल्या संघाला प्रोत्साहित केले.
संघाचे ड्रेस कोड स्पर्धेचे आकर्षण
नियमाप्रमाणे सर्व संघातील खेळाडूंना आपल्या निवडी नुसार एकच ड्रेस कोड घातल्यामुळे एका उच्च दर्जाची स्पर्धा होत असल्याचा अनुभव क्रिकेटप्रेमींनी अनुभवत आहे क्रिकेट स्पर्धेचे विशेष आकर्षण आहे
समालोचक म्हणून रमजान पटेल वासेफ पटेल, गुणलेखक म्हणून राजू भोईटे,चिकू,पंच म्हणून प्रतीक कुलकर्णी, एनडी यांनी काम बघितले तर राहुल चौधरी पप्पू पटेल , यांच्यासह प्रमोद चव्हाण माँनीग सी. सी. चे असंख्य खेळाडू परिश्रम घेत आहे.


