राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे जळगावात आगमन – दोन दिवस शहरात ~ जैन उद्योग समूहाला भेट


जळगाव – महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचे आज २७ रोजी संध्याकाळी ०६ वाजून २० मिनिटांनी जळगाव विमानतळावर आगमन झाले दोन दिवस ते जळगाव शहरात असून आज जैन हिल्स येथे त्यांचा मुक्काम आहे. तर उद्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कार्यक्रमास उपस्थित राहून संध्याकाळी चार वाजता पुन्हा विमानाने मुंबईला प्रयाण करणार आहेत.
आज रविवारी जळगाव विमानतळावर कोश्यारी यांचे स्वागत पालकमंत्री गुलाबराव पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासह मान्यवरांनी केले यावेळी विमानतळ वर महापौर, आमदार, खासदार जैन उद्योग समूहाचे अशोक भाऊ जैन, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू वायुनंदन उपस्थित होते.