भुसावळात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महिलांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न :


भुसावळ – येथील माँसाहेब जिजाऊ मराठा महिला मंडळ व सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
मराठा समाज मंदिर संचलित श्री.गाडगेबाबा विद्यालयाच्या प्रांगणात महिलांची हिमोग्लोबिन ब्रेस्ट स्कॅन व इतर समस्यांचा संबंधित तपासणी करण्यात आली.पुरुष व महिला यांची बोन मॅरो डेन्सिटीची तपासणी करण्यात आली.या शिबीरात जवळपास १५४ शिबिरार्थी यांनी लाभ घेतला.
या शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड उपस्थित होते. प्रथम महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांचे हस्ते
पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
व्यासपीठावर एपीआय गोटला , माजी नगरसेवक ललित मराठे, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ सुवर्णा गाडेकर , डॉ प्रशांत रामवंशी, डॉ वैशाली रामवंशी, किरण पाटील, ॲड जास्वंदी भंडारी, अलका भगत उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगतात उपविभागीय पोलिस अधिकारी वाघचौरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज कसे‌ अष्टपैलु व्यक्तीमत्व होते त्यांची युद्धनीती , सर्वांना सोबत घेवून काम करण्याची महाराजांची पद्धती यावर भाष्य केले.
डॉ.सुवर्णा गाडेकर यांनी महिलांनी आरोग्याची कशी काळजी घ्यावी यावर मार्गदर्शन केले.पोलिस निरिक्षक राहुल गायकवाड यांनीही उपस्थितीनां मार्गदर्शन केले व शिव चरित्रावरील पुस्तकाचे वाटप केले.
शिबिरास सहकार्य करणाऱ्या अर्पणा हॉस्पिटलचे डॉ सुवर्णा गाडेकर, ओर्थोपेडीक डॉ प्रशांत रामवंशी, डॉ.वैशाली रामवंशी, अक्षय जेरवाल (इंटेग्रल फार्मा ) दानिश शेख, अयुब खान यांना महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी डिवायएसपी वाघचौरे व पोलिस निरीक्षक गायकवाड यांची बीएमडी तपासणीने शिबिरास सुरुवात झाली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.जास्वंदी भंडारी यांनी केले.आभार .डी.के पाटील यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड जास्वंदी भंडारी(पाटील), अलकाताई भगत, मनोरमा ओगले, सारिका चौधरी , रविंद्र तुंडलायत , दीनानाथ ओगले, किरण पाटील, हितेश टकले, सचिन पाटील, उत्कर्ष भंडारी, रुपेश पाटील, हर्षल रंधे, ॲड निलेश भंडारी, योगेश जाधव, राहुल पाटील, प्रमोद पाटील, गिरीश पवार ,रवि लेकुरवाळे ,विद्यालय समिती , पोलिस प्रशासन, मराठा महिला मंडळ व सकल मराठा समाज बांधव व भगिनींचे सहकार्य लाभले .