वरणगाव शिवसेनेतर्फे शिवजयंतीनिमित्त अभिवादन : शिवभोजन केंद्रावर मोतीचूर लाडू वाटप :

भुसावळ – वरणगाव येथील शहर शिवसेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित शिवाजी महाराज यांच्या पुतड्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शहर शिवसेना यांच्या वतीने नगरपालिका जवळील शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला औक्षण करून पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, जिल्हा संघटक विलास मुळे, शहर प्रमुख संतोष माळी, निलेश ठाकूर, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, सईद मुल्लाजी, उपशहर प्रमुख राम शेटे, सुखदेव धनगर, हर्षल वंजारी, सागर वंजारी, भास्कर गवळी, सुनील चौधरी, पंकज चौधरी, वैभव लोखंडे, बाळा माळी, किरण माळी, गोविंदा चौधरी, सागर माळी, दिगंबर माळी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

शिवभोजन केंद्रावर शिवजयंती निमित्त मोतीचूर लाडू वाटप

वरणगाव येथील शिवभोजन केंद्रावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज बस स्टँड चौकातील शिवभोजन केंद्रावर वरण-भात, पोळी, पनीर मिक्स भाजी आणि मोतीचूर लाडूचे वाटप करण्यात आले. 100 लाभार्थी यांना पाच किलो मोतीचूर लाडूचे वाटप झाल्याची माहिती शिवभोजन केंद्र संचालक तथा शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी यांनी दिली.