भुसावळात अहिल्यादेवी कन्या विद्यालयात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा :

भुसावळ -श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचालित अहिल्यादेवी कन्या विद्यालयात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
येथील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेली श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संस्था सातत्याने नवनवीन उपक्रम राबवित असते आज 19 फेब्रुवारी रोजी विद्यालयातील सर्व शिक्षक विद्यार्थिनी मिळून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाच्या माननीय मुख्याध्यापिका सौ मानसी कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री संजीव पाटील सर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते शिवप्रतिमा पूजन झाले तदनंतर विद्यार्थिनींनी छत्रपती शिवरायांचा इतिहास विद्यार्थ्यांपुढे मांडला या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती भगवे फेटे, भगवे झेंडे, भगव्या पताका आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक पेहराव परिधान करून विद्यालय परिसर शिवमय झाला होता कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थिनींनी अंगावर शहारे आणणारे पोवाडे सादर केले शिवजन्मोत्सवाचा सजीव देखावा सादर केला, पाळणा गीत गायले छत्रपती शिवरायांच्या घोषणानी विद्यालयात प्रचंड उत्साह संचारला होता विद्यालयातील शिक्षक श्री नारायण घोडके सर यांनी छत्रपती शिवरायांचा रोमांचक इतिहास आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यां पुढे मांडला विद्यार्थिनींच्या मनोगतात गुंजन मावळे, कादंबरी चौधरी ,तनुश्री भट,नयना जाधव यांनी मनोगत मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षिका सौ सोनाली वासकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ अर्चना पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले.