भुसावळात पालकमंत्री गुलाबराव पाटिल यांचे हस्ते विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन :

भुसावळ – महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ, शिवसेना उपनेते व जळगाव जिल्हा पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळयाचे तसेच श्रीनगर परिसरातील काँक्रीटीकरणाचा शुभारंभ शनिवार, दिनांक १२ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १०.३० वा.
होणार असून सदर कार्यक्रमास भुसावळ परिसरातील मान्यवर उपस्थित राहणार आहे. या प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन माजी नगरसेवक दीपक धांडे, माजी नगरसेविका शारदा धांडे यांनी केले आहे.