भुसावळात गावठी कट्टा बाळगणाऱ्या एकास अटक !


भुसावळ/फैैैजपुुुर – गावठी कट्टा बाळगत असल्याची माहिती मिळल्यावरून
शहरातील गंगाराम प्लाट म्युन्सीपल हायस्कुल मागील एक गावठी कट्टा बाळगत असल्याची माहिती मिळल्यावरून नाशिक,विशेष पथक व फैजपुर पो.स्टे.यांनी मिळून संयुक्त कारवाई करून आरोपीस अटक केली आहे.
पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक,विशेष पथक यांना दिनांक ११ रोजी गोपनीय माहिती मिळल्यावरून जळगांव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील गंगाराम प्लाँट म्युन्सीपल हायस्कुल मागील विशाल प्रकाश पाचपांडे वय 23 यांच्या कब्ज्यात गावठी कट्टा बाळगत असल्याच्या माहितीची खात्री करून नाशिक, विशेष पथक व फैजपुर पोलीस स्टेशन .यांनी मिळून संयुक्त कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपी कडून गावठी कट्टा 25,000/रु. एक राऊन्ड 1000,/रु.मोटर सायकल 30,000,अशा एकुण 56,000/रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच आरोपीने गावठी कट्टा देणारा शिकलकर (नाव माहित नाही) रा.पार उमर्टी ता.वरला जि.बडवाणी ( मध्यप्रदेश) येथून विकत आणल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी फैजपुर पो.स्टे ला गुरुन क्रमांक 25/ 2022अर्म अँक्ट३/25, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई फैजपुर पोलीस स्टेशनला सिध्देश्वर आखेगांवकर, सहाय्यक फौजदार बशिर तडवी,हेकॉ रामचंद्र बोरसे,पोना मनोज दसाने,हेकॉ राजेश ब-हाटे , फैजपुर पो.स्टे. पोना किरण चाटे फैजपुर पो.स्टे. पोना चेतन महाजन फैजपुर पो.स्टे. पोना उमेश सानप अशांनी मिळून केली.