बुलढाणा येथील पैंग्नागा संस्थेच्या अध्यक्ष नीता हिवाळे क्रांतिज्योति सावित्री रत्न आदर्श पुरस्काराने सन्मानित ;

भुसावळ – सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बुलढाणा ( नाद्रकोळी ) येथील पैंग्नागा संस्थेच्या अध्यक्षसौ नीता
अनिल हिवाळे यांना नुकताच क्रांतिज्योति सावित्री माईची आदर्श लेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या पुरस्कार बद्दल सर्व स्तरातील मित्र परिवार व हितचिंतक यांनी शुभेच्छा देवून त्यांचे अभिनंदन केले आहे .
येथील आय एम ए हॉल येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योति सावित्री माईची आदर्श लेक सन्मान सोहळा 2022 चे संपन्न झाला .
यावेळी प्रमुख पाहुणे न्यायधीश आरिफ शेख यांच्या हस्ते नीता
अनिल हिवाळे यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले . यावेळी स्त्रीरोग तज्ञ डॉ सुवर्णा गाढेकर , अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सौ जयश्री इंगळे , सौ अरुणा इंगळे , सौ कोल्हे , सौ संगीता नेवे , सौ भारती म्हस्के ,अंजुम खान , सौ संगीता भामरे , वेटलिफ्टर छोटू खान , सौ संगीता सोनवणे , सौ निरंजना तायडे यांचेसह मान्यवर उपस्थित होते . यावेळी कार्याची दखल घेवून त्यांना सावित्रीमाई रत्न पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला . या पुरस्कारात सन्मानार्थी यांना अनुश्री संस्थेच्यावतीने प्रमाणपत्र , सावित्रीमाई यांची प्रतिमा व पैठणी देवून सत्कार
करण्यात आला .