भुसावळ – येथील एम आय तेली इंग्लिश मिडीयम या शाळेतील आदर्श शिक्षिका अंजुम खान यांना नुकताच अमरावती येथील संस्थेतर्फे बेस्ट वुमन अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रसंगी भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा किरण पतुरकर , औद्योगिक क्षेत्रातील समाजसेविका नर्गिस अली, समाजसेविका स्वाती बडगुजर,सुरेखा लुंगारे , आदी मान्यवरांचे उपस्थितीत स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले .
याबद्दल शाळेचे संस्थाध्यक्ष हाजी मुन्ना तेली , मुख्याध्यापक हाजी सैय्यद वाजिद अली यांनी सुद्धा तज्ञ समाजसेविका , वकिल,दक्षता समिती सदस्या , सल्लागार ,महिला शक्ती समाज सेवा महिला मंडळ अध्यक्षा अंजुम खान यांचा नुकताच शाळेच्यावतीने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात स्मृतिचिन्ह देवून सत्कार केला. यावेळी उपस्थित मान्यवरानी मनोगत व्यक्त केले . सुत्रसंचलन चंद्रशेखर भारंबे यांनी केले तर इमरान सर यांनी आभार मानले. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षेतर कर्मचारी उपस्थित होते .




