भुसावळ – विधी सेवा समिती मध्ये उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल येथील विधितज्ञ अँड प्रिया रमेश अडकमोल यांना नुकताच क्रांतिज्योति सावित्री माईची आदर्श लेक पुरस्कार प्राप्त झाला असून या पुरस्कारबद्दल भुसावळ वकील संघ अध्यक्ष अँड तुषार पाटिल , महिला संघ अध्यक्षा अँड सौ जास्वंदी भंडारी यांचेसह भुसावळ बार असोसिएशनचे सर्व सदस्य मित्र परिवार व हितचिंतक यांनी शुभेच्छा देवून अभिनंदन केले आहे .
येथील आय एम ए हॉल येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योति सावित्री माईची आदर्श लेक सन्मान सोहळा 2022 चे संपन्न झाला .
यावेळी प्रमुख पाहुणे न्यायधीश आरिफ शेख यांच्या हस्ते अँड प्राची अडकमोल यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले . यावेळी स्त्रीरोग तज्ञ डॉ सुवर्णा गाढेकर , अनुश्री संस्थेच्या अध्यक्षा सौ जयश्री इंगळे , सौ अरुणा ताई , सौ कोल्हे , सौ संगीता नेवे , सौ भारती म्हस्के ,अंजुम खान , सौ संगीता भामरे , वेटलिफ्टर छोटू खान , सौ संगीता सोनवणे , सौ निरंजना तायडे यांचेसह मान्यवर उपस्थित होते . प्रसंगी कर्तुत्ववान महिलांच्या कार्याची दखल घेवून त्यांना सावित्रीमाई रत्न पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला . या पुरस्कारात सन्मानार्थी यांना अनुश्री संस्थेच्यावतीने प्रमाणपत्र , सावित्रीमाई यांची प्रतिमा व पैठणी देवून सत्कार
करण्यात आला .



