वरणगाव – शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने वरणगाव शहरातील शिवसेना शहरप्रमुख आणि उर्वरित कार्यकारिणी शिवसेनेचे मुखपत्र असलेले दैनिक सामना या वृत्तपत्रातून शनिवार 25 जानेवारी रोजी प्रसिद्ध झाली. या कार्यकारिणीत वरणगाव शहर उत्तर आणि दक्षिण असे दोन विभागाची कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे.

शहरप्रमुख उत्तर विभाग – संतोष बळीराम माळी (आपला माणूस), उपशहर प्रमुख राम दत्तात्रय शेटे, शेख अझहर शे. शकरुद्दीन, शहर संघटक पंकज कडू चौधरी, उपशहर संघटक आसिफ मोहम्मद मनियार, भूषण कडू बाविस्कर, शहर समन्वयक हर्षल अनिल वंजारी, उपशहर समन्वयक शेख अयाज शे. बाबू, अबूबकर फकीरा खान, विभाग प्रमुख किरण गुणवंत माळी, शेख समीर शे.ईकरोमोद्दीन, स्वप्निल अरुण चौधरी, उपविभाग प्रमुख पंकज प्रल्हाद माळी, सय्यद अरबाज सय्यद जाकीर, पवन राजेंद्र चौधरी, शेख अजहर शे. मजीद, दीपक अनिल चौधरी, शेख गफ्फार शे. नथू, प्रसिद्धीप्रमुख सागर बंडू महाजन
दक्षिण विभाग शहर प्रमुख – निलेश रमेश ठाकूर, उपशहर प्रमुख तुषार शांताराम चौधरी, सुखदेव रामदास धनगर, अशोक प्रतापराय शर्मा, शहर संघटक प्रशांत बळीराम पाटील, उपशहर संघटक कैलास अशोक पाटील, उपशहर संघटक कृष्णा उत्तम माळी, शहर समन्वयक अमर प्रदीप सोनार, उपशहर समन्वयक जयेश नरेंद्र तोताणी, वसीम शहा युसूफ शहा, विभाग प्रमुख पंकज बाळू पाटील, अनिल मधुकर इंगळे, उपविभाग प्रमुख रुपेश तोताराम ठाकूर, शकील शहा इस्माईल शहा, सचिन सोपान माळी, गोविंदा पितांबर चौधरी, गजानन संतोष वाघ, शेख सुफियान शे. फय्युमोद्दीन, प्रसिद्धीप्रमुख मुस्तफा शहा शकील शहा असे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.
वरणगाव शहर प्रमुख आणि उर्वरित कार्यकारणीचे रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलास पारकर, भुसावळ तालुका संपर्कप्रमुख सुरेश राणे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर, उपजिल्हा संघटक विलास मुळे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


